NCP leader Dilip Walse Patil expresses concern over the FDA's new milk procurement standards requiring minimum fat and SNF levels, warning of potential financial losses for millions of dairy farmers in Maharashtra. Sarkarnama
पुणे

FDA Milk Purchase Rule: तुकाराम मुंढेंच्या खात्याच्या नव्या नियमांमुळे दुग्ध व्यवसायाला फटका; राष्ट्रवादीचा बडा नेता नाराज

FDA Milk Purchase Rule, Maharashtra Milk Farmers, Fat SNF Rule: एफडीएच्या नव्या दूध खरेदी नियमांनुसार ३.२ फॅट व ८.३ एसएनएफपेक्षा कमी दर्जाचे दूध स्वीकारले जाणार नाही. दिलीप वळसे पाटील यांनी यामुळे लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली.

Sudesh Mitkar

Pune News: अन्न व औषध प्रशासनाच्या दूध खरेदीच्या फॅट आणि सॉलिड नॉट फॅट च्या नव्या नियमांमुळे राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसण्याची भीती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी या नव्या नियमावलीवरून चिंता व्यक्त केली असून, याचा दुग्ध व्यवसायावर दूरगामी आणि गंभीर परिणाम होईल, असा इशारा दिला आहे.

नव्या नियमात काय आहे?

नव्या नियमावलीनुसार, राज्यातील कोणत्याही डेअरीने किंवा दूध संकलन केंद्राने ३.२ फॅट आणि ८.३ SNF पेक्षा कमी दर्जाचे दूध खरेदी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. जर दूध या निकषांवर पूर्ण उतरले नाही, तर ते प्रक्रिया कंपन्यांना किंवा डेअरीला स्वीकारता येणार नाही, ते दूध शेतकऱ्यांना परत करावे लागेल.

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार

दिलीप वळसे पाटील म्हणाले, "केंद्राचा कायदा सांगतो की शेतकर्‍याने किंवा सप्लायरने आणलेले दूध जसे असेल तसे स्वीकारले पाहिजे. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या नियमांमुळे कंपन्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. जर दुधाला ठरवून दिलेले फॅट आणि SNF नसेल, तर ते दूध शेतकऱ्याला परत करावे लागेल. ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील दूध उत्पादक शेतकरी या नव्या निकषांचे दूध देऊ शकतील का? हा मोठा प्रश्न आहे." असं वळसे पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, गाईच्या दुधाला नैसर्गिकरित्या फॅट आणि SNF चे प्रमाण कमी असते. जर हे दूध निकष पूर्ण न केल्यामुळे परत केले गेले, तर राज्यात दुधाचे संकलन कमालीचे घटेल. यामुळे दुधाचे भाव वाढतील हे जरी खरे असले, तरी शेतकऱ्यांचे दूधच खरेदी केले गेले नाही, तर त्यांना याचा काय फायदा होणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दूध व्यवसायाला चालना देण्याची गरज

महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून दूध व्यवसायाला मोठी गती मिळाली आहे. "मामासाहेब मोहोळ यांच्यापासून ते अजितदादांपर्यंत सर्वांनीच महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना नेहमी प्रोत्साहन दिले आहे. शेतकर्‍यांना चार पैसे मिळावे यासाठी वीज सवलत किंवा कर्ज माफी दिली जाते. अशा परिस्थितीत, हा नवा जाचक नियम दुग्ध व्यवसायाला अडचणीत आणणारा ठरेल. या निर्णयाचा दूरगामी परिणाम काय होणार, याचा विचार सरकारने गांभीर्याने करण्याची गरज आहे," असा इशारा वळसे पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT