Shrikant Deshpande
Shrikant Deshpande Sarkarnama
पुणे

Kasba and Chinchwad : कसब्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार अधिक

सरकारनामा ब्युरोे

By poll Election : राज्यात महिलांपेक्षा पुरुष मतदार अधिक असल्याने बहुतांश मतदारसंघात चित्र आहे. मात्र, पुण्यातील कसबापेठ त्याला अपवाद आहे. येत्या रविवारी (ता.२६) तेथे होत असलेल्या पोटनिवडणुकीत चक्क पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. ते ही थोडेथोडक्या नाही, तर पावणेदोन हजारांनी ते अधिक आहेत.

Election Commision राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी २६ तारखेला मतदान होत असलेल्या कसब्यासह चिंचवडबाबत ही तसेच निवडणूक तयारीची माहिती दिली. मतदारसंख्या विचारात घेता चिंचवड हा राज्यात सर्वात मोठा मतदारसंघ आहे. तेथील व कसब्याच्याही आमदारांचे निधन झाल्याने या दोन्ही ठिकाणी ही पोटनिवडणूक होत आहे.

कसब्यात (Kasba election) एकूण दोन लाख ७५ हजार ६७९ मतदार आहेत. त्यात एक लाख ३६ हजार ९८४ पुरुष, तर एक लाख ३८ हजार ६९० महिला आहेत. म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मतदार एक हजार ७०६ ने अधिक आहेत. एकूण मतदारांत सहा हाजर ५७० दिव्यांग, तर १९ हजार २४४ हे ८० वर्षावरील, ११४ अनिवासी, ६८ सैनिक आणि पाच तृतीयपंथी मतदार आहेत.

चिंचवडमध्ये (Chinchwad) कसब्याच्या उलट चित्र आहे. तेथे पुरुष मतदार जास्त आहेत. तेथील पाच लाख ६८ हजार ९५४ मतदारांत तीन लाख दोन हजार ९४६ पुरुष, तर दोन लाख ६५ हजार ९७४ स्त्रिया आहेत. तेथे १२ हजार ३१३ दिव्यांग, नऊ हजार ९१६ हे ८० वर्षावरील, ३३१ अनिवासी, १६८ सैनिक आणि ३४ तृतीयपंथी मतदार आहेत.

चिंचवडमध्ये १३, तर कसब्यात ९ मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत. तेथे सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजअखेर चिंचवडमध्ये ४३ लाखांची रोकड, पाच लाख रुपयांची दारू, ९५ हजारांचा गांजा असा ४९ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यातुलनेत कसब्यात निवडणूक विभागाची ही कारवाई कमी म्हणजे दहा लाख एवढी झाली आहे. तेथे पाच लाखाची रोकड, २१ हजाराची दारू आणि पाच लाख रुपयांचे २५ ग्राम एमडी हा मादक पदार्थ पकडण्यात आले आहे.

चिंचवडला (Chinchwad) पेड न्यूज प्रकरणी एका उमेदवाराला नोटीस बजावण्यात आली आहे. तर कसब्यात 'पेड न्यूज' प्रकरण आढळले नाही. आय़ोगाच्या 'सी व्हिजील अॅप'वर कसब्यात आलेल्या ५३ आणि चिंचवडमधील १० तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. मतदार केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी 'रॅम्प', 'व्हिलचेअर्स' आणि 'मॅग्निफाईंग ग्लास'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावाही आयोगाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT