Ashwini Jagtap : अश्विनी जगतापांच्या उमेदवारीमुळं भाजपमध्ये हुरूप; तर राष्ट्रवादीचं वाढलं टेन्शन

Chinchwad By-Election : महाविकास आघाडीकडून कुणाला मिळणार उमेदवारी?
Ashwini Jagtap
Ashwini JagtapSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad BJP : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानं आता तेथे पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिलीय. भाजपच्या या खेळीने या महाविकास आघाडीतून या मतदारसंघावर हक्क सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढलंय. आता त्यांना आपला उमेदवार विचार करून आणि तेवढाच तगडा द्यावा लागणार आहे.

दिवंगत आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, तर त्या विजयी होतात,असा पोटनिवड़णुकीचा इतिहास आहे. त्यामुळे चिंचवडमधील अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या उमेदवारीने भाजपमध्ये हुरूप वाढला आहे तर तर राष्ट्रवादीचं टेन्शन वाढल्यांचं दिसून येतंय.

शहर भाजपची अश्विनी जगताप यांनाच तिकिट देण्याची एकमुखी इच्छा होती. त्यांच्याशिवाय दुसऱ्या उमेदवाराला एका गटाने कडाडून विरोध केला होता. त्यामुळं पक्षानेही ही भावना विचारात घेतल्यांचं या निवडीवरून दिसून येत आहे. या उमेदवारीमुळं आता आमचा विजय सोपा झाल्यांच शहर भाजपचे सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे (Moreshwar Shedge) यांनी सांगितलं.

Ashwini Jagtap
Kasaba By-Election : एक वर्षाचाच कालावधी होता, उमेदवारी मिळाली असती तर बरं झालं असतं...

याबाबत मोरेश्वर शेडगे म्हणाले, "अश्विनीताई यांना तिकिट देत पक्षाने जगताप कुटुंबाला न्याय दिलाय. लक्ष्मणभाऊंनी तीन वर्षात केलेले भरीव कामांचा हातभार अश्विनीताईंच्या विजयाला लागणार आहे", असेही ते म्हणाले. दुसरीकडे अश्विनी जगतापांच्या उमेदवारीमुळे आघाडीचं त्यातही राष्ट्रवादीचे टेन्शन वाढलं आहे. कारण भावनेच्या लाटेचा फायदा प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळेल, अशी भीती त्यांना सतावत आहे.

Ashwini Jagtap
Kasaba By-Election : टिळक कुटुंबाहेरील व्यक्तिला उमेदवारी देण्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण..

महाविकास आघाडीतून (MVA) कसबा आणि चिंचवडचा आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरल्यात जमा आहे. कसबा काँग्रेस (Congress),तर चिंचवड राष्ट्रवादी (NCP) लढण्याची दाट शक्यता आहे. भाजपने या दोन्ही ठिकाणी उमेदवार जाहीर करीत आघाडीवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे चिंचवडमध्ये इच्छूकांच्या मांदियाळीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवारीचे अद्याप तळ्यात मळ्यातच चालले आहे. तर, कसब्यातही काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही.

Ashwini Jagtap
Chinchwad By-election News : चिंचवडसाठी राष्ट्रवादीतील चौघे इच्छुक; आयात उमेदवाराच्या चर्चेने अस्वस्थता !

दरम्यान आज व उद्या सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. त्यामुळं शेवटच्या दोन दिवसात म्हणजे येत्या सोमवारी व मंगळवारीच आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची उमेदवारी दाखल होईल. त्यानंतर जेमतेम १५ दिवसांत प्रचाराची कसोटीच लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com