Election Commission
Election Commission Sarkarnama
पुणे

Pune Bypoll Election : 'फिफ्टी-फिफ्टी'ने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाची टक्केवारी काय सांगते?

सरकारनामा ब्युरोे

Kasba and Chinchwad news update : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26 फेब्रुवारी) मतदान काही अपवाद वगळता शांततेत पार पडले. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली होती. या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच अत्यंत संथगतीने मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत मतदारांनी निरुत्साह दाखविला. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी तीननंतर मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लावल्या होत्या.

या पोटनिवडणुकीसाठी चिंचवडला 50.47 टक्के तर कसब्यात 50.६ टक्के मतदान झाले. दरम्यान दिवसभर चिंचवडकरांनी उत्साह दाखविला. तर दुपारनंतर कसब्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पाहावयास मिळाली. सायंकाळी सहा वाजता नियमानुसार मतदान केद्रांत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे उशीर झाल्याने अनेकांना मतदान करता आले नाही.

या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 3.52 टक्के, तर कसब्यात 6.5 टक्के मतदान झाले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 10.45 टक्के तर कसब्यात 8.25 टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 20.68 टक्के तर कसब्यात 18.5 टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत चिंचवडला 30.55 टक्के तर कसब्यात 30.5 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 41.1 तर कसब्यात 45.25 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, दुपारी तीन वाजल्यानंतर चिंचवड आणि कसब्यात अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र मतदानाची वेळ संपल्याने अनेकांना मतदान करता आले नाही. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्क्यावर काही अंशी परिणाम झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT