Ajit Pawar- Vikram Kumar - Rajendra Bhosle  Sarkarnama
पुणे

PMC Commissioner News: पुणे महापालिकेत 'दादा'गिरी; विक्रम कुमार गेले अन् राजेंद्र भोसले आले

Pune Politics : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी 15 तास महापालिका कमिशनर विक्रम कुमारांच्या बदलीचा आदेश निघाला. विक्रम कुमारांच्या बदलीनंतर महापालिकेचे कमिशनर म्हणून 'आयएएस' डॉ. राजेंद्र भोसले नेमणुकीच्या आदेश काढला आहे.

Dnyanesh Savant

Mumbai News : ठाकरे सरकारमध्ये पुणे महापालिकेच्या 'कमिशनर' पदाच्या खुर्चीत बसलेले, शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये वर्ष-सव्वा वर्ष नुसतेच बदलीच्या चर्चेत राहिलेले आणि महापालिकेतच कायम राहिलेल्या कमिशनर विक्रम कुमारांची बदली करण्यावर हे सरकार अखेर राजी झाले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी 15 तास महापालिका कमिशनर विक्रम कुमारांच्या बदलीचा आदेश निघाला. विक्रम कुमारांच्या बदलीनंतर महापालिकेचे कमिशनर म्हणून 'आयएएस' डॉ. राजेंद्र भोसले यांना नेमणुकीचा आदेश काढला आहे. पुणे महापालिकेतील हे पद खेचण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांची स्पर्धाच रंगली असतानाच पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉ. भोसलेंना कमिशनरच्या खुर्चीत बसवले आहे.

डॉ. भोसले यांना महापालिकेत आणण्यासाठी अजितदादा हे प्रचंड आग्रही राहिल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही शेवटी डॉ. भोसलेंच्या नावाला होकार दिल्याचे समजते. डॉ. भोसलेंना पुण्यात बसविण्यात सरकारमधील तीनही बड्या मंडळींचा पुढाकार असल्याचे स्पष्ट आहे.

विक्रम कुमार हे अजिदादांच्या जवळचे मानले जाते होते. कोरोनाच्या काळात पुणे महापालिकेचे तत्कालीन कमिशनर शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली होताच, 27 जुलै 2020 रोजी विक्रम कुमार हे पुणे महापालिकेचे कमिशनर झाले. त्यांच्या नेमणुकीला चार वर्षे होत आली, तरीही बदली झाली नव्हती.

राज्यात ठाकरे सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस येताच, कुमार यांच्या बदलीची चर्चा रंगली. त्यानंतर शिंदेंच्या जवळच्या नेत्यांनी मध्यस्थी करत, विक्रम कुमारांची बदली थांबवल्याचे बोलले गेले. याच काळात बदली होणार, बदली होणार, अशी चर्चा विक्रम कुमारांभोवती नेहमीच असताना ते टिकून राहिले.

पहिल्या टप्प्यात शिंदेंकडून विक्रम कुमारांना वर्षभराची मुदतवाढ मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विक्रम कुमार (Vikram Kumar) हे 'एमआयडीसी'चे आयुक्त होणार, त्यांच्या जागी श्रावण हर्डीकर महापालिकेत येणार असल्याचेही सरकारमधून सांगण्यात येत होते. हीही चर्चाच राहिली.

प्रत्यक्षात मात्र, हे सरकार येऊन आता दीड-पावणेदोन वर्षे होत आली; तरीही विक्रम कुमार हे महापालिकेतून हलले नाहीत. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांची बदली करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे आधी ‘पीएमआरडीए’चे कमिशनर होते. तेव्हाही ते अजितदादांच्या जवळचे मानले जात होते.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT