Baramati Loksabha News : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आणखी एक पवार मैदानात...

Sai Pawar आमदार रोहित पवार यांची भगिनी सई पवार यांनी आज इंदापूर तालुक्यात गाव संपर्क दौऱ्याला लावली हजेरी
Sunetra Pawar, Supriya Sule
Sunetra Pawar, Supriya Sulesarkarnama

Baramati Loksabha News : बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगताना दिसत आहे. पवार कुटुंबातील प्रत्येकजण दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात दिसत आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार मैदानात उतरले होते, तर इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या गाव संपर्क दौऱ्यांत आमदार रोहित पवार यांच्या भगिनी सई पवार यांनी हजेरी लावली.

बारामतीत राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही संपर्क मोहीम हाती घेतली आहे. बारामतीची ही निवडणूक भलतीच प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष फोडून आपले वेगळे अस्तित्व दाखवले आहे. आता लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ लढवण्याचा निर्धार केला आहे. या जागोवरून त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे.

Sunetra Pawar, Supriya Sule
Baramati Loksabha Constituency : ‘आता सगळ्यांनी मिळून पवारांना पाडा; होऊद्या एकदा त्यांचा कार्यक्रम’

ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूकडून ताकद पणाला लावण्यात आली आहे. सुनेत्रा पवार लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार मैदानात उतरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, भगिनी सई पवार यांनी ही उपस्थिती लावली. त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबच निवडणुकीच्या प्रचारात पाहायला मिळत आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Sunetra Pawar, Supriya Sule
‘अजितदादांना साथ दिली तर...’, सुनेत्रा पवारांचं सूचक विधान | Sunetra Pawar | Ajit Pawar | Baramati |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com