खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी बुधवारचा मुक्काम खडवासल्याचे भाजपा आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडीतील घरी केला. रात्रीच्या जेवणात पोळी-भाजी आणि दही-भाताचे जेवण त्यांनी घेतले. सितारमण यांच्या साधेपणाने भारावलेल्या तापकीर परिवाराने (Tapkir Family) आलेल्या पाहुण्यांचे मनापासून आदरातिथ्य केले.
तीन दिवसांच्या दौऱ्यातील तीनही दिवस हॉटेलमध्ये न राहता सितारमण कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करणार आहेत. आज पुण्यात आल्यानंतर शहर भाजपाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या पुण्यातील धनकवडी येथील आमदार ताकीर यांच्या घरी पोचल्या.यावेळी रंजनाताई, सुवर्णाताई, नीलिमाताई आणि कावेरीताई या तापकीर परिवारातील ज्येष्ठ महिला व मुली अश्विनी, रोमा,ऐश्वर्या यांनी औक्षण करून स्वागत केले.
आमदार भीमराव तापकीर व पुतण्या अभिषेक तापकीर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दारात रांगोळी व घरात ठीक ठिकाणी फुलांची सजावट केली होती. गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या केल्या होत्या. घरच्या परिसरात मांडव उभारला होता. आमदार तापकीर यांनी कुटुंबातील 40 हुन अधिक जणांची ओळख करून घेतली. एकत्रित कुटुंब पाहून त्यांनी स्वतः कुटुंबासमवेत फोटो काढले. देशाच्या अर्थमंत्री मुक्कामाला येणार असल्याने तापकीर परिवाराने जय्यत तयारी केली होती.
सितामरण यांनी पिवळ्या रंगांची साडी घातली होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही बडेजाव दिसला नाही. साधी राहणी, चेहऱ्यावरील हास्य यामुळे, तापकीर परिवार भारावून गेले होता. आमदार तापकीर यांचा मुलगा रोहित याचा आज वाढदिवस होता.सितारमण यांच्या उपस्थितीत रोहितचा वाढदिवस ही साजरा केला.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, शहर प्रमुख जगदीश मुळीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अर्थमंत्री सीतारामन या शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या आहारात कांदा लसूण नसतो. त्यामुळे, आवडीचा दही भात, चपाती व भेंडीची भाजी, बटाट्याची रस्सा भाजी असा आहार त्यानी रात्रीच्या जेवणात घेतला. त्यानंतर, सोलकढी घेतली. तापकीर यांच्या घरातील सर्व सुनांनी जेवणाची तयारी केली होती. त्यांनीच जेवण वाढले.
—------------------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.