नवी दिल्ली : सगळे जण एकत्र येत आहेत. सगळे मिळून एकत्र या तुम्हाला असमान दाखवतो. आपले काही गद्दार, मुन्नभाई एकत्र येत आहेत. हे माझे ठाकरे कुटुंब आहे, संपवून दाखवा,असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे गटनेत्यांच्या मेळाव्यात केले. त्यांच्या या टीकेला काही मिनिटातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहेत. आम्हाला काय आसमान दाखवता आम्हीतर तुम्हाला तीन महिन्यापुर्वीच आसमान दाखवलं, अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. ते दिल्लीत बोलत होते.
शिंदे म्हणाले, राज्य प्रमुखांची भेट घेण्यासाठी आम्ही दिल्लीत आलो आहेत. आम्हाला सत्तेची लालसा नव्हती,आम्ही मोदी आणि बाळासाहेबांचा फोटो लावून निवडणुक लढवली होती. मात्र विरोधकांसोबत सत्ता स्थापनं केली. तेव्हा विश्वास होत नव्हता. या विरोधात आम्ही उठाव केला आहे. बाळासाहेब कॅाग्रेस आणि राष्ट्रवादीला शत्रू मानत होते. मात्र, त्यांनी त्यांच्या विचाराशी प्रतारणा केली. मात्र त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याशी युती केली गेली. सत्तेत असूनही आमच्या आमदारांवर अन्याय होत होता. त्यावेळी मी त्यांना मदत केली. त्यांचं तेव्हा कोणी एकत नव्हत. ज्यावेळी सहन करणं असह्य झालं यामुळे आम्ही हा उठाव केला.
आम्ही जर चुकीचं केलं असतं तर लाखोंच्या संख्येंने लोक जमतात आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करतात. राज्याबाहेर देखील आमच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. तुम्ही उठाव केल्याने तुम्ही वनवास बंद केला. आमच्या या निर्णयास सर्व आमदार आणि खासदारांनी साथ दिली आहे. इतर राज्यातील प्रमुखांसाठी देखील आम्ही काम करणार आहे. ज्यांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांच्यासोबत धोका केला जाणार नाही. शिवसेना ही प्रायव्हेट कंपनी नसून रक्ताच पाणी करून उभी केलेली बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्हाला यामुळे गावागावातून समर्थन मिळत आहे. आता झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना लोकांनी नाकारले आहे.
आपण जर शिवसैनिकांना नोकर म्हणत असाल तर कोण तुमच्या सोबत राहील. गेली अडीच वर्षात त्यांना गटप्रमुख दिसत नव्हते. मात्र आज त्यांना आम्ही उठाव केल्याने ते आठवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. गद्दार कोण ही विचार करण्याची वेळ आहे. गद्दार कोण आणि खुद्दार कोण ये पब्लिक सब जानती है! ते आम्हाला खोके सरकार म्हणत आहेत. मात्र त्यांचा हिशोब माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहित आहेत. वेळ आल्यावर सर्व सांगेल, असा इशाराही त्यांनी ठाकरेंना दिला आहे.
मोदी आणि शहा यांनी मला मुख्यमंत्री बनवलं आहे. आमचा यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी हा उठावं केला. राज्यातील कुठल्याही भागात जातोय लोक हजारोंच्या संख्येंने स्वागत करत आहेत. लोकांना आमचा निर्णय आवडत आहे. त्यामुळे त्यांनी मी त्यांचा माणूस वाटत आहे. ते आम्हाला मिंदे गट म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे खंद्दे आहोत. आम्ही तुम्हाला तिन महिन्या आधीच आसमान दाखवलं आहे, असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
दरम्यान, आता आम्ही ठोकळा खातोय म्हणतात, मात्र आम्ही ठेचा खावूनच त्यांना ठेचले आहे. आम्हाला आभिमान आहे की ते म्हणातात बाप चोरणारी टोळी म्हणतात. मग आम्ही बापांचा विचार विकणारे तुम्हाला म्हणायचं का?, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.