Pune Police : तनिषा भिसे यांच्यावर उपचार करण्यात हलगर्जी केल्या प्रकरणी डॉ.सुश्रुत घैसास यांच्यावर अलंकार पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.19) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ससूनच्या चौकशी समितीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कुठलाही ठपका ठेवला नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, चौकशी समितीच्या अहवालानंतर अवघ्या दोन दिवसातच प्रियंका पाटे यांच्या फिर्यादीवरून घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका या तनिषा यांच्या नणंद आहेत. त्यामुळे ससूनच्या अहवालावर पोलिसांनी चार मुद्यांवर पुन्हा ससूनकडे अभिप्राय मागवल्याने ते चार मुद्दे कोणते याची चर्चा सुरू झाली आहे.
ससूनकडून जो अहवाल पोलिसांन प्राप्त झाला त्यावर पोलिसांनी चा मुद्यांवर ससूनकडे अभिप्राय मागवला होता. त्यातील पहिला मुद्दा होता तो पेशंटची स्थिती गंभीर असताना उपचारासाठी रुग्णालयात तब्बल पाच तास का थांबवले. त्यांना उपचार का दिले नाहीत हा आहे.
मुले जन्माला यायची होती मात्र त्यापूर्वीच एनआययूसाठी पैसे मागणे योग्य होते का? रुग्णाला ऑपरेशनची गरज असताना पाच तास रुग्णालयातील ओपीडीमध्ये थांबले हे योग्य नाही का? रुग्णालय धर्मादाय असताना योजनेतून रुग्णावर उपचार करणे शक्य असताना अतिदक्षता विभागात उपचार का सुरू केले नाहीत? या मुद्यांवर ससूनचा अभिप्राय पोलिसांनी मागवला आहे.
तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दहा लाखांचे डिपाॅजिट मागत पाच तास थांबवून घेतल्याची घटना 31 मार्चला घडल्याचा आरोप भिसे कुटंबीयांनी केला होता. दोन एप्रिलाल तनिषाच्या मृत्यूनंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर सरकारच्या विविभ विभागाच्या चार समितींनी या प्रकरणी चौकशी केली. अखेर शनिवारी (ता.19) वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी डाॅ.घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.