Crime News Sarkarnama
पुणे

Crime News : महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला दणका, ओंकार कदमसह सात जणांवर गुन्हा दाखल

FIR Filed Against Omkar Kadam : महिला अधिकाऱ्याला ओंकार कदम आणि त्याचे सहकारी वारंवार त्रास देत होते. मात्र, सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याच्यावर महापालिका प्रशासन सुरुवातील कारवाई करत नव्हते, असा आक्षेप घेतला जात आहे.

Roshan More

Pune News : पुणे महापालिकेतील आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याला धमकावणे भाजप पदाधिकाऱ्याला महागात पडले आहे. महिलेने या प्रकरणी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या पदाधिकाऱ्याला महापालिकेच्या आवारात येण्यास बंदी घातली होती. आता महिला अधिकाऱ्याने त्रास देणारा भाजप पदाधिकारी ओंकार कदम याच्यासह तब्बल सात जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ओंकार कदम, अक्षय कांबळे यांच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची नाहक बदनामी करणे आणि इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिला अधिकाऱ्यांकडे कोणतेही काम नसतानाही तिचा वारंवार पाठलाग करणे, कार्यालयात येऊन सर्वांच्या समोर अपमानजनक टिप्पणी करणे आणि बदनामी करणे, असे प्रकार सातत्याने ओंकार कदम करत होता. या सर्व प्रकारामुळे आपल्याला भीती वाटत असल्याचे देखील महिला अधिकाऱ्याने पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

महिला अधिकाऱ्याला ओंकार कदम आणि त्याचे सहकारी वारंवार त्रास देत होते. मात्र, सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याच्यावर महापालिका प्रशासन सुरुवातील कारवाई करत नव्हते. अखेर महिलेने महिला आयोगाकडे धाव घेत यासंदर्भात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी ओंकार कदम आणि त्याच्या सहकाऱ्यांना पालिका आवारात येण्यास बंदी घातली.

या प्रकरणी अद्यापही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. ओंकार कदम आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने देखील घेतली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT