Adv. Pravin Chavan & Tejas More Sarkarnama
पुणे

तेजस मोरेही प्रविण चव्हाणांना घेरणार; आता लढाई आरपारची

Pravin Chavan | Tejas More : तेसज मोरेंनी उचलले कायदेशीर पाऊल

सरकारनामा ब्युरो

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पेन ड्राईव्ह प्रकरणाने आता आणखी एक वळण घेतले आहे. या प्रकरणात फडणवीस यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून दिल्याचा आरोप असलेले तेजस मोरे (Tejas More) यांनी या प्रकरणातील मुख्य संशयित माजी सरकारी वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या विरोधात पुण्यातील शिवजीनगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. प्रविण चव्हाण हे तेजस मोरे यांचा गैरवापर करत होते असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच हे प्रकरण संवेदनशील असल्याने याचा तपास लवकरात लवकर व्हावा अशी विनंती देखील करण्यात आला आहे.

याबाबत मोरे यांचे वकील अनुपकुमार यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, काही राजकीय मंडळींच्या विरोधात एक कट रचला होता. त्यात तेजस मोरे यांना सहभागी करायचा प्रयत्न प्रविण चव्हाण करत होते. यामुळे मोरे यांनी चव्हाण यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले आहेत. याशिवाय मोरेंच्या विरोधातील आरोप बिनबुडाचे आहेत. मोरेंनी कोणत्याही प्रकारचा स्मार्ट टीव्ही, घड्याळ लावून देण्याचा प्रयत्न केलेला नाही. स्टिंग ऑपरेशनही त्यांनी केलेले नाही. हे फक्त आरोप आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे अडकवले जावू शकते. त्यांना धमक्या देखील येत आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे.

यापूर्वी या प्रकरणात प्रविण चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तेजस मोरेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गोपनीयता भंग, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चव्हाण यांनी केली आहे. प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये केलेले स्टिंग ऑपरेशन हे तेजस मोरे यांनीच केले असल्याचा चव्हाण यांनी आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह नंतर (Fadnavis Pen Drive) संपूर्ण नाट्याला सुरुवात झाली होती. त्यामुळे अधिवेशनात गदारोळ झाला होता.

हे पेनड्राईव्ह सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये प्रविण चव्हाणांवर अनेक आरोप केले होते. ते आरोप फेटाळून लावत तेजस मोरे या त्यांच्या आशिलाने कॅमेरा असलेले घड्याळ त्याच्या ऑफिसमध्ये लावल्याचं चव्हाण यांनी सांगितले आहे. हे घड्याळ त्यानेच आणलं होतं. आधी त्याने एसी लावण्याचा प्रयत्न केला त्याला मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर स्मार्ट टीव्ही लावण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला. मी मुंबईला गेलेलो असताना त्याने हे घड्याळ इथे लावलं. त्यासाठी लागणारा इलेक्ट्रिशीयन देखील त्यानेच आणला होता, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT