ठाकरे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा..वाघ कडाडल्या

''थोडी लाज ठेवा, मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका..''
Chitra Wagh, Uddhav Thackeray
Chitra Wagh, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी त्यांच्या भाषणातून अनेकदा 'आशा वर्कर्सचं' कौतुक केलं आहे. पण फक्त कौतुकाने पोट भरत नाही. आशा वर्कर्सना (Asha Worker)असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतय, अशी परिस्थिती सध्या राज्यातील आशा वर्कर्स ची झाली आहे.

राज्यात कोरोनाचे संकट असताना कोरोना योद्धात आशा वर्कर्स यांचेही योगदान महत्वाचे होते. कोरोना लसीकरणात विशेषतः ग्रामीण भागात आशांनी महत्वाची भूमिका बजावली, पण त्यांना यासाठी ३५ रुपये मानधन देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. पण अद्याप हे मानधन त्यांना मिळालेले नाही.

राज्यात निम्मे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहे. तिसरी लाट ओसरत आहे, हे असे असताना त्यांना त्यांचे मानधन कधी मिळणार, असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी ठाकरे सरकारला केला आहे. चित्रा वाघ यांनी टि्वट करुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबवले जातात. आशा वर्कर्सच्या मदतीने हे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रमही राबवण्यात येत असतो. पण कुटुंब नियोजनाच्या उपक्रमामुळे आशां समोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारण कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आशा वर्कर्सना रबरी लिंग देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर (Asha Worker) नाराज असल्याचं चित्र आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयावर टि्वट करुन चित्रा वाघ संतापल्या. ''सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा…आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून..थोडी लाज ठेवा मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका..''असे चित्रा वाघ यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या दीड वर्षात साधारण तीन हजारांहून अधिक आशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली. पण मूलभूत सुविधाही सरकारकडून मिळत नसल्याचं आशा स्वयंसेविकांचं म्हणणं आहे. राज्यातल्या अंदाजे ७० हजार आशा वर्कर्स आहेत.

Chitra Wagh, Uddhav Thackeray
दोन वर्षात यशवंत जाधवांकडे ३६ मालमत्ता, तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असणार?

साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अशा जबाबदार्‍या आशा वर्कर्स वर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com