Forced Helmet again in Pune
Forced Helmet again in Pune sarkarnama
पुणे

पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्ती; १ एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

सरकारनामा ब्यरो

पुणे : पुण्यात (Pune) पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्वांना हेल्मेट (Helmet) बंधनकारक असणार आहे. ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. हे आदेश १ एप्रिल म्हणजे उद्यापासूनच लागू होणार आहेत. या बाबतचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी काढले आहेत. दुचीकीचे सर्वात जास्त अपघात होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

डॅा. राजेश देशमुख यांनी काढलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, वाहन अपघातामध्ये दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकीस्वार, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकांच्या तुलनेने दुचाकी चालकांना अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जास्त आहे. त्यापैकी सुमारे ६२ टक्के व्यक्तीना डोक्याला हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू होतात. त्यामुळे डोक्यात हेल्मेट असल्यास अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते.

त्यामुळे, जनतेस मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट आवश्यक असणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षाहून अधिक काळ मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. आज राज्यमंत्री मंडळाने मास्कपासून नागरिकांना मुक्ती दिली आहे. कोरोना काळात असलेले सर्व निर्बंध हटवले होते. त्यातच आता पुणेकरांना पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीला सामोरे जावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT