Ravindra Dhangekar News : विधानसभा निवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर सायलेंट मोडवर गेलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. गत काही दिवसांपासून त्यांची शिवसेना प्रवेशाची चर्चा आहे. नुकतीच त्यांच्या घरी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन धंगेकर यांना शिवसेना प्रवेशाचे अधिकृत निमंत्रणही दिले आहे.
मात्र मित्र पक्ष भाजपचा धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) प्रवेशाला विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष बदलाला सध्या तरी अल्पविराम मिळालाय. त्याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या कसबा विधानसभा मतदारसंघांत लागलेले धंगेकरांचे पोस्टर्स चर्चेत आहेत.
या पोस्टर्सच्या माध्यमातून धंगेकर पुन्हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेले असून त्यांनी भाजप विरोधात आघाडी उघडली असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील बहुतांश चौकांमध्ये धंगेकर यांच्या नावाने काही पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची भाजपने (BJP) फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत मते घेतली, आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसुल करण्यात येत आहे.
कसब्यातील सुज्ञ जनता त्यांच्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, अशी टीका भाजपवर करण्यात आली आहे. मतदारसंघातील बहुतांश चौकांमध्ये धंगेकर यांच्या नावाने काही पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे धंगेकर यांचा शिवसेना प्रवेश सध्या तरी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.