Sangram Thopte sarkarnama
पुणे

Sangram Thopte News: मोठी बातमी! संग्राम थोपटेंनी दिला काँग्रेसचा राजीनामा; दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?

Sangram Thopte Resigns from Congress : थोपटे घराणे हे मुळचे काँग्रेसचे मानले जाते. संग्राम थोपटे यांचे वडील तब्बल सहा वेळा आमदार तर संग्राम थोपटे स्वतः तीन वेळा आमदार होते.

Roshan More

Sangram Thopte News : भोर-मुळशी मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मोठे पाऊल उचलत काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. या विषयीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे. मागील काही दिवसांपासून थोपटे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. उद्या (रविवार) संग्राम थोपटेंनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. भाजप प्रवेशाबाबात ते या बैठकीत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोपटे घराणे हे मुळचे काँग्रेसचे मानले जाते. संग्राम यांचे वडील आनंत थोपटे तब्बल सहा वेळा काँग्रेसकडून आमदार झाले होते. त्यांनी मंत्रिपद देखील भूषवले होते. त्यानंतर संग्राम थोपटे यांनी देखील सलग तीनवेळा भोर-मुळशी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

काँग्रेसमध्ये असताना विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना ते पद मिळाले नाही. मंत्रि‍पदापासून देखील त्यांना डावलण्यात आले, असा त्यांचा समर्थकांचा आरोप होता. भोरमधून ते विधानसभा जिंकतील अशी अपेक्षा असताना मांडेकर यांनी धक्कादायक निकाल नोंदवत थोपटेंना पराभूत केले. त्यामुळे राजकीय भविष्याचा विचार करत ते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा होती.

शरद पवारांना घेरण्याची रणनीती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याची रणनीती गेले अनेक वर्ष भाजप करत आहेत. त्यात संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर या रणनीतीला मोठे यश आल्याचे मानले जाईल. कारण लोकसभा निवडणुकीत भोर-मुळशी मतदारसंघ हा शरद पवारांना साथ देणार मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र, थोपटेंच्या भाजप प्रवेशाने येथील राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT