Amit Shah : शहांच्या जेवणावर फडणवीस सरकारने 'कोट्यवधी' उधळले? तटकरेंचा पाहुणचार 'महागात' पडल्याचा दमानियांचा आरोप

Raigad Politics : मागील आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनाचा कार्यक्रम शहांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यानंतर त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन केले होते.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Raigad : मागील आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनाचा कार्यक्रम शहांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यानंतर त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन केले होते. याच स्नेहभोजनसाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.

अंजली दमानिया ट्विट करत म्हणाल्या, जनतेने कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास HELIPAD? ती पण चार चार Helipad? अमित शाह यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शाह यांना जेवायला घालायचय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना? मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा. देवेंद्र फडणवीस यांचे पुनःश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकार मधे खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Amit Shah
Raigad Politics : जयंत पाटलांचं घर फुटलं, धसका राष्ट्रवादीला : भाजप जिल्हा परिषद स्वबळावर काबीज करणार?

अमित शहांच्या दौऱ्याला चार हेलिपॅड :

अमित शहा हे रायगडवरील कार्यक्रम आटोपून तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी जेवणासाठी गेले. जाताना रायगडावरून 20 किलोमीटर असलेल्या सुतारवाडीत ते हेलिकॉप्टरने उतरले. हेच हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी 4 युनिटचे हेलिपॅड तयार करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. यासाठी 7 एप्रिल रोजी 1 कोटी 39 लाख रुपयांचे टेंडरही काढले होते. 'मीड डे' या वर्तमानपत्रात 9 एप्रिल रोज हे टेंडर छापूनही आले होते, असे त्यांनी सांगितले.

Amit Shah
Raigad : गोगावलेंचं 'पालकमंत्रिपदाचं' स्वप्न धुळीस! फडणवीसांची राष्ट्रवादीसाठी बॅटिंग, शहांकडे टाकला शब्द!

सुनिल तटकरेंनी केला होता पाहुणचार :

अमित शहा यांच्या स्नेहभोजनात तटकरे यांनी फक्कड कोकणी बेत आखला होता. शाह हे शाकाहारी असल्याने ते मासे खात नाहीत. पण हापूस आंब्याचा सिझन असल्याने त्यांच्यासाठी आमरस-पुरीचे नियोजन करण्यात आले होते. याशिवाय मिसळपाव, मोदक आणि साबुदाणा वड्याचा पाहुणचार होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अन्य मंत्र्यांसाठी खास माश्यांचा आणि मटणाचा पाहुणचार होता. जेवण झाल्यानंतर सोल कढीही केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com