vanraj andekar sarkarnama
पुणे

Vanraj Anderkar : 5 राऊंड फायर केले, पण वनराज आंदेकरांचा मृत्यू गोळीबारानं नाही, मग कसा झाला?

Vanraj Anderkar Murder Case : वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणी सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी 10 आरोपी निष्पन्न झाले आहेत.

Akshay Sabale

सागर आव्हाड :

Vanraj Anderkar Latest News : अनेक वर्षांपासून टोळीयुद्धापासून शांत असलेले पुणे रविवारी रात्री अशांत झाले. त्याचं कारण ठरले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा झालेला खून. वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केला. यानंतर आंदेकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वी आंदेकर यांचा मृत्यू झाला.

वनराज आंदेकर हे नाना पेठेतील डोके तालीम चौक येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास उभे बोते. यावेळी 12 ते 13 जणांच्या टोळक्यानं वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर धारदार कोयत्यानं त्यांच्यावर हल्ला केला होता. पण, आंदेकर यांचा मृत्यू गोळीबारानं झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

आंदेकर यांच्यावर बंदुकीतून धाड... धाड.. धाड असे 5 राऊंड फायर करण्यात आले होते. मात्र, आंदेकर यांचा मृत्यू गोळीबारानं नाही, तर कोयत्यानं हल्ला केल्यानं झाला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलेली आहे.

सहा गाड्यांवरून आले अन्...

वनराज आंदेकर यांच्यावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यात वनराज आंदेकर हे नाना पेठेते डोके तालीम परिसरात असलेल्या घराजवळ एका सहकाऱ्यासह उभे होते. त्यावेळी अचानक सहा गाड्यांवरून 13 जण तिथे आले. बेसावध असलेल्या वनराज आंदेकर हे चिंचोळ्या गल्लीत पळून जात होते. मात्र, हल्लेखोरांनी गोळीबार आणि धारदार कोयत्यानं आंदेकर यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले.

10 जणांना अटक...

वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणी सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी 10 आरोपी निष्पन्न झाले असून 4 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहित पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT