vanraj andekar cctv video  Sarkarnama
पुणे

Vanraj Andekar Shot : सहा गाड्यांवरून हल्लेखोर आले अन्...; वनराज आंदेकरांच्या खूनाचा थरकाप उडविणारा CCTV व्हिडिओ समोर

Akshay Sabale

Vanraj Andekar Murder CCTV Video: ऐन वर्दळ असलेल्या नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री नाना पेठेत घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या थरकाप उडविणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

वनराज आंदेकर यांच्या डोक्यात कोयत्यानं वार करत त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली. सणासुदीच्या तोंडावर शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. हल्ल्यानतंर आंदेकर यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असताना उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

खूनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ...

अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यानुसार आंदेकर हे नाना पेठ येथे सहकाऱ्यासह उभे होते. यावेळी सहा गाड्यांवरून तेरा जण अचानक तिथे आले.

त्यांना पाहून निळा शर्ट घातलेले वनराज आंदेकर हे छोट्या गल्लीत पळून जात आहेत. यावेळी एकानं आंदेकर यांच्या डोक्याला बंदूक लावून गोळ्या झाडल्या. बाकी हल्लेखोरांनीही आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. तर, काहीजणांनी त्यांच्यावर कोयत्यानं वार केले. यानंतर हल्लेखोर पसार झाल्याचं दिसत आहेत. (Pune Crime News)

तीन संशयित ताब्यात...

वनराज आंदेकर (Vanraj Andekar) खून प्रकरणी पुणे पोलिसांनी 12 तासांतच 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वाद आणि पैशातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमनाथ कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि जयंत कोमकर, अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT