Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरण अपडेट; 12 तासांतच पोलिसांची मोठी कारवाई

Vanraj Andekar Murder Case : वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्यावर रविवारी रात्री हल्ला करून खून केल्याचं खळबळ उडाली आहे.
Vanraj Andekar
Vanraj AndekarSarkarnama
Published on
Updated on

Vanraj Andekar Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या डोक्यात कोयत्यानं वार करत त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली. गणेशोत्सवाच्या तोंडावरच शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असताना उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.

वनराज आंदेकर खून प्रकरणी पुणे पोलिसांनी 12 तासांतच 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वाद आणि पैशातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 3 जणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयांकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Vanraj Andekar
Vanraj Andekar Shot Dead: VIDEO वनराज आंदेकर यांच्या हत्येचा थरार; नेमकं काय घडलं?

नेमकं घडलं काय?

वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. ते कोसळल्यावर त्यांच्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या.

परिसरात घबराट

गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट पसरली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्याअगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. वत्सला आंदेकर यांनीदेखील पुण्याचे महापौरपद भूषाविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com