Ajit Pawar sarkarnama
पुणे

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी वाढणार ; अजितदादांनी सांगितलं कारण..

इंधन दरवाढीमुळे (Fuel Price Hike) सरकारला देशातल्या जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-diesel Prices) सातत्यानं वाढ होत आहे. याशिवाय एलपीजी सिलिंडरचे (LPG Cylinder) दरदेखील वाढवण्यात आले आहेत. इंधन दरवाढीमुळे (Fuel Price Hike) सरकारला देशातल्या जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षांनी तर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात निदर्शनं सुरू केली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी आज इंधन दरवाढीचे समर्थन केलं आहे. या दरवाढीमागील कारण त्यांनी सांगितलं. ''पेट्रोल डिझेलच्या किंमती आणखी वाढणार,'' असे अजित पवार म्हणाले. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

''रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine War) सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे,'' असं अजित पवार म्हणाले.

''नागरिकांच्या सोयीसाठी डायल ११२ चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला होईल, अशी तयारी पुण्यात सुरु आहे त्यासाठी १ कोटीचे अनुदान देण्यात आलं आहे. पुणे पोलिसांना चांगल्या गाड्यांची गरज होती त्यामुळे त्यांना गाड्या देण्यात आल्या आहेत. आमदारांना जो निधी दिला आहे तो लोकांच्या हितासाठी खर्च करायचा आहे. आम्ही जो निधी देतो तो जनतेचा पैसा आहे, तो लोकांसाठीच आहे तो लोकांसाठी मार्गी लागला पाहिजे,'' असे पवार म्हणाले.

एसटीच्या संपाबाबत अजित पवार म्हणाले, ''एसटीचा प्रश्न सुटलेला आहे. ३१ मार्च पर्यंत जे येणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. परिवहनमंत्री

अनिल परब यांनी काल अधिवेशनात याबाबत समंजस भुमिका घेतली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ केलेली आहे - आता त्यांना ही शेवटची संधी आहे. सध्या परीक्षा सुरु आहेत, विद्यार्थ्यांना एसटीची गरज आहे,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT