जुन्नरमध्ये बिबट सफारी होणार ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, शरद सोनवणेंचे उपोषण मागे

शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)यांच्या हस्ते सरबत घेऊन शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले.
Sharad Sonawane
Sharad Sonawanesarkarnama

नारायणगाव : 'जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी व्हावी,' या मागणीसाठी माजी आमदार सोनवणे यांनी जुन्नर येथे २२ मार्च पासून उपोषण सुरू केले होते. काल उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती.

''जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी होणार आहे,'' असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सचिन खारगे यांनी दिले. माजी आमदार शरद सोनवणे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)यांच्या हस्ते सरबत घेऊन शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले, अशी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी दिले.

जुन्नरच्या बिबट सफारीवरुन आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली होती. आमदार अतुल बेनके (Atul Benke)यांनी या बिबट्या सफारीचा सर्व्हे सुरु झाला असल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane)यांनी बिबट सफारीला मंजुरी मिळाली, सर्व्हे सुरू झाला हे आमदार बेनके यांचे सर्व थोतांड असल्याचे म्हटलं आहे.

Sharad Sonawane
परबांचे रिसॅार्ट तोडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक खारगे यांनी माजी खासदार आढळराव पाटील व माजी आमदार सोनवणे यांच्या बरोबर मोबाईलद्वारे संपर्क साधून उपोषण मागे घ्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगितले.

''जुन्नरच्या बिबट सफारी संदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला फोन केला होता. मात्र बघू, करू यावर माझा विश्वास नाही. जुन्नरच्या बिबट सफारी मंजुरीचा सरकारचा लेखी आदेश येईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे. बिबट सफारीसाठी मी बलिदान करायला तयार आहे,'' अशी ठाम भूमिका माजी आमदार शरद सोनवणे यांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सोनवणेंनी उपोषण मागे घेतले.

Sharad Sonawane
रावणाचा जीव बेबींत, यांचा जीव मुंबईत ; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

''पुरवणी मागण्यात बिबट सफारीसाठी निधी देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री ठाकरे यांनी मान्य केले असताना माजी आमदार सोनवणे यांनी सुरू केलेले उपोषण हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप आमदार बेनके यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com