Pooja Khedkar, Manorama Khedkar Sarkarnama
पुणे

IAS Pooja Khedkar : खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत आणखी वाढ; 'त्या' मालमत्तेचा लिलाव होणार

The property of Pooja Khedkar family will be auctioned : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. खेडकर कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या एका कंपनीचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Chaitanya Machale

Pune News, 27 July : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. खेडकर कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या एका कंपनीचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ही लिलावाची कारवाई करणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी काम करणाऱ्या पूजा खेडकर यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे अनेक कारणे समोर आली आहेत. पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या एमआयडीसी (MIDC) परिसरात एक कंपनी आहे.

या कंपनीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स थकविला असल्याचे समोर आले आहे. या कंपनीला वारंवार प्रॉपर्टी टॅक्स भरण्याच्या नोटीस देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता कोट्यवधी रुपये किमतीच्या या कंपनीचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या मालकीची थर्मोव्हेरिटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने महापालिकेचा लाखोंचा कर थकविला आहे. त्यामुळे, ही कंपनी कर संकलन विभागाकडून सील करण्यात आली होती. संबंधित कंपनीने तातडीने महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरावा अशा नोटीस देखील संबंधित कंपनीला बजविण्यात आल्या होत्या.

मात्र, याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण कंपनीच्या प्रमुखांनी स्वीकारल्याने ही कंपनी लिलावत काढली जाणार आहे. लवकरच लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या मिळकत कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, आपल्या कामगिरीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांची चौकशी यूपीएससीने (UPSC) सुरू केली आहे. यूपीएससीची परीक्षा देताना त्यांनी कागदपत्रात केलेल्या फेरफारंमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा यांचे प्रशिक्षण थांबवून त्यांना तातडीने मसुरीला येण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्यांनी काही कळविलेले नसल्याचे समोर आले आहे. परीक्षा देताना त्यांनी सादर केलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र देखील खोटे असल्याचा आरोप केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT