BJP Vs Shivsena : 'संजय राऊतांसाठी मजबुरी का नाम उद्धव ठाकरे आणि फडणवीस खलनायक...'; भाजप नेत्याचा हल्लाबोल

Sudhir Mungantiwar On Sanjay Raut : "संजय राऊतांना 'सामना'मधील नोकरी कायम ठेवायची आहे. त्यामुळे त्यांना रोज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलावे लागते. ती त्यांची मजबुरी आहे. ते फडणवीसांना नायक म्हणू शकत नाहीत. म्हणून..."
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 27 July : रोज सकाळी महायुतीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना राज्याचे वन आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे.

राऊतांना 'सामना'मधील नोकरी कायम ठेवायची आहे. त्यामुळे त्यांना रोज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात बोलावे लागते. ती त्यांची मजबुरी आहे. ते फडणवीसांना नायक म्हणू शकत नाहीत. म्हणून शब्दछल करतात आणि नायक ऐवजी खलनायक म्हणतात, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

मुनगंटीवार म्हणाले, संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. इतके वर्ष उद्धव ठाकरे यांची चाकरी करूनही त्यांना आपण शरद पवारांचा माणूस नाही हे त्यांना सिध्द करावं लागत आहे. त्यामुळे ते रोज बोलतात. राजकीय तर्क काढतात, सल्ले देऊन उद्धव ठाकरेंना खुश करतात, आसा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावर देखील मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आरक्षणा संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. याबाबत सरकार संवेदनशील आणि सकारात्मक आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करावी.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Sharad Pawar Vs Amit Shah : शरद पवार हसले अन् म्हणाले, 'तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलाय'

आरक्षणावर सरकार लाईव्ह चर्चा करेल, पण पहिले तुमची भूमिका स्पष्ट करा. मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यायचे की स्वतंत्र द्यायचे हे सांगा, भूमिका लपवून ठेवायला पोखरनची चाचणी आहे का? असा सवाल विरोधकांच्या भूमिकेवर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने मदत न केल्याने शरद पवार निराश झाले आहेत. सात जागांच्या भरोशावर कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत नेते होण्याचं स्वप्न ते पाहत होते, अशी खोचक टीका त्यांनी परावांवर केली.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
NCP Vs BJP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या आमदाराचा केला 'करेक्ट कार्यक्रम'; संतप्त आमदार म्हणाले, "गद्दार यशस्वी होत नाहीत..."

निवडणूक ही कार्यक्षमतेचे आधारावर व्हावी, जातीवर नाही. सार्वजनिक जीवनात जगताना जातीच्या आधारावर जगत नाही. जातीची शिडी वापरून सत्तेत जाण्याचा स्वप्न महाविकास आघाडीचे नेते बघत आहेत. ही राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com