Ganesh Visarjan Live 2022
Ganesh Visarjan Live 2022  sarkarnama
पुणे

Ganesh Visarjan Live 2022 : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत चर्चा 'या' बॅनरची..

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यात आज लाडक्या बाप्पाला (Ganesh Visarjan Live 2022) निरोप देण्यात येत आहेत. विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महत्वाच्या असलेल्या अलका टॉकीज चौकात लावलेल्या एका बॅनरची चर्चा रंगली आहे. (Ganesh Visarjan Live 2022)

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले, अंतर्गत कलहामुळे शिवसेनेत उभी फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत ४० आमदारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली.

शिवसेना आमचीच असा दावा, एकनाथ शिंदे करीत आहेत. हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. ही लढाई निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे हे नेहमी आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे वासरदार असल्याचा दावा करीत आहेत. शिंदे गटाने शिवसेना शाखा स्थापन करण्यास सुरवातही केली आहे. या शाखेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचा फोटो असतो.

पुण्यातील अलका टॅाकीज चौकात लावलेल्या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅनरवर देखील उद्धव ठाकरेंसोबतच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे.शिवसेनेच्या बॅनरवरही धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो झळकल्याने या बॅनरची चर्चा रंगली आहे.

या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या संभाषणाचा एक मजकूर लिहिला आहे ‘अखंड महाराष्ट्रा सदैव आपल्यासोबत’ बाळासाहेब ठाकरे यांनी ‘आनंद दिघे माझे कट्टर शिवसैनिक’ असं म्हटलं होतं. तर आनंद दिघे यांनी ‘माझी जात-गोत्र-धर्म फक्त शिवसेना’ असं म्हटलं होतं. हे दोन्ही उल्लेख या बॅनरवर करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT