PMC Election Bandu Aandekar And Family .jpg Sarkarnama
पुणे

Pune Election: गँगस्टार बंडू आंदेकरसह सून अन् भावजय शनिवारी उमेदवारी अर्ज भरणार; राष्ट्रवादी की अपक्ष लढणार?

PMC Election 2026 : पुणे महानगरपालिकेच्या यापू्र्वीच्या निवडणुकीत आंदेकर कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसकडून,काँग्रेस पक्षाशी संबंधित राहिलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंबाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की ते अपक्ष लढणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

Deepak Kulkarni

Pune News: पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची 5 सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात बंडू आंदेकर,लक्ष्मी आंदेकर,सोनाली आंदेकर यांच्यासह एकूण 15 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

पण आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुणे गँगवॉर प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर (Bandu Andekar) आणि त्याच्या कुटुंबियातील सदस्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयानं परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.तीनही उमेदवार शनिवारी (ता.27)उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी (PMC Election) बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या तिघांना निवडणूक लढवण्यास न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. पण याचदरम्यान, आंदेकर टोळीनं हत्या केलेल्या आयुष कोमकरची आई संजीवनी कोमकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या व्हिडिओत आयुषच्या आईनं सर्वच राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं की,सर्व पक्षाच्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जर आम्हाला न्याय देता येत नसेल तर आमच्यावरती अन्याय तर करू नका. आंदेकरांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका.माझ्या लहान मुलाचं त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. सत्तेची पॉवर त्यांच्याकडे आहे म्हणूनच ते या थराला पोहोचले असल्याचंही म्हटलं होतं. तसेच कोणत्याही पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास मी त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही आयुषच्या आईनं दिला होता.

विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार,पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी कुख्यात बंडू आंदेकरसह त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. हे तीनही आरोपी शनिवारी (ता.27) पोलीस बंदोबस्तात आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. न्यायालयानं यावेळी कोणतीही मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषणे करू न करण्याची सक्त ताकीदही आरोपींना दिली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या यापू्र्वीच्या निवडणुकीत आंदेकर कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसकडून,काँग्रेस पक्षाशी संबंधित राहिलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंबाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की ते अपक्ष लढणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मात्र,पण सध्या आंदेकर कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक असल्याची चर्चा आहे.पण अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT