Pune municipal election : भाजपसोबत चर्चा, पण जागावाटपात दगाफटका झालाच तर..., पुण्यासाठी शिवसेनेचा प्लॅन बी तयार ?

MahaYuti seat sharing News : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडीना वेग आला आहे.
After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.
After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.Sarkarnama
Published on
Updated on

PUNE News : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडीना वेग आला आहे. पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सुरु आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या शिवसेनेची युतीबाबत बोलणी सुरु आहे तर यामध्ये काँग्रेस मत स्वबळावर लढणार असल्याचे दिसत आहे.

यामुळे पुणे महापलिका निवडणुकीची लढत चौरंगी होणार असल्याचे दिसत आहे. त्यातच या लढतीमध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये भाजप शिंदे यांच्या शिवसेनेला १५ ते २० जागा सोडण्याची शक्यता असल्याने मंत्री उदय सामंत मुंबईत युतीबाबत चर्चा करीत आहेत तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर त्यांनी बी प्लॅन तयार ठेवला आहे.

After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.
BJP Rebel Fear : भाजपला सतावतेय बंडखोरीची भीती, बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये खदखद!

पुण्यातील महायुतीबाबत शुक्रवारी दुपारपासून मुंबईत हालचालींना वेग आला आहे. या ठिकाणी युतीबाबत सीएम फडणवीस यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांची चर्चा सुरु आहे. यावेळी भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित आहेत. त्याठिकाणी पुण्यातील भाजप-शिवसेना युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.

After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.
Shivsena Politics : ऐन निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा! पक्षातून कार्यकर्त्याची हकालपट्टी करताच माजी महापौरांनी दिला राजीनामा

पुण्यातील चर्चेवेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी गुरुवारी 60 उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी मंत्री उदय सामंत यांनी 'वर्षा' बंगल्यावर जात युतीच्या जागा वाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे आता अंतिम तोडगा निघतो का? ते पाहणे महत्त्वाचे आहे.

After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.
NCP News : पुण्यानंतर आता ठाण्यात दोन राष्ट्रवादींची 'दिलजमाई'; एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार?

पुण्यात येत्या काळात जर शिवसेनेला भाजपकडून अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत आणि महायुतीच्या जागावाटपाची चर्चा फिस्कटली तर शिवसेनेने प्लॅन बी तयार ठेवला आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत पुण्यात युतीची चाचपणी सुरु केली असल्याचे समजते. या दोन्ही पक्षांमध्ये यावरून चर्चा सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. भाजप जर शिवसेनेला सन्मानजनक जागा द्यायला तयार नसल्याने राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.
Congress BMC election : आघाडी तुटूनही काँग्रेस निभावणार छुपी मैत्री? मुंबईत ठाकरेंना फायदा होण्यासाठी व्यूहरचना

पुणेकरांची उत्सुकता शिगेला

पुण्यातील शिवसेनेचा एक मोठा नेता यासंदर्भातील प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुणे महानगर पालिका एकत्र लढवण्यासंदर्भात चर्चा पडद्यामागे सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे शेवटच्या चार दिवसांत काय घडामोडी घडणार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोणत्या पक्षासोबत चर्चा होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.
Pune BJP : पुण्यात भाजप आमदारांनी उघडले उमेदवारांचे पत्ते : जम्बो प्रवेशानंतर नव्या-जुन्यांची धडधड वाढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com