Sharad Mohol
Sharad Mohol Sarkarnama
पुणे

Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून 2 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल

सरकारनामा ब्यूरो

Pune News, 23 May: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गेल्या पाच जानेवारी रोजी कोथरूड भागातील सुतारदरा भागात खून (Sharad Mohol Murder Case) झाला होता. याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. गुरुवारी (ता. २३) विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुन्हे शाखेने सोळा आरोपींविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

मोहोळ खूनप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. त्यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणात आत्तापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह अन्य आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली.

शरद मोहोळचा खून झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळजवळ मोटारीचा पाठलाग करून आठ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच काडतुसे आणि दोन मोटारी ताब्यात घेतल्या होत्या. जमिनीच्या आणि आर्थिक वादातून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT