CM Eknath Shinde: आता आठवण कशी आली? तहानलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Marathwada Drought Situation: मराठवाड्याची स्थिती ही ना धरणांत पाणी ना चारा अशी झाली आहे. यामुळे अशीच स्थिती राहिली तर मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थीत आणखी भीषण होण्याची स्थिती आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama

Aslam Shanedivan

Marathwada Drought Situation, 23 May: राज्याच्या विविध भागात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे, मराठवाड्यात मात्र सुर्य आग ओकत आहे. येथे उन्हाच्या झळा वाढल्या असून नागरिक हैराण झाले आहेत. मराठवाड्यातील अनेक धरणांनी मे महिन्यातच तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासह जणावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभेच्या धामधुमीत नेतेमंडळी व्यग्र आहेत. आचारसंहिता सुरु असल्यामुळे दुष्काळग्रस्त (Marathwada Drought) भागाना मदत करण्यासाठी प्रशासनाला अडचणी येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून दुष्काळसदृश स्थितीचा ते आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत गुंग असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तहानलेल्या मराठवाड्याची आता आठवण कशी आली असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.

CM Eknath Shinde
Maharashtra Politics: फुटलेल्या शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या 'नशिबा'त पुढं अजून काय- काय वाढून ठेवलंय?

मराठवाड्याची स्थिती ही ना धरणांत पाणी ना चारा अशी झाली आहे. यामुळे अशीच स्थिती राहिली तर मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थीत आणखी भीषण होण्याची स्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्यांना वणवण करावी लागत आहे. हिरवा चारा नसल्याने प्राण्यांचेही मोठे हाल होत आहेत.

मराठवाड्यात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या १८२८ टँकर पाणी पुरवठ्यासाठी लागत आहेत. दरम्यान मे महिना संपण्यास अजून आठ दिवस शिल्लक असून मान्सून सुरू होण्यास देखील वेळ आहे. यामुळे येथे परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सर्व जिल्हाधिकारी, सर्व पालकमंत्री, कृषी अधिकाऱ्यांसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित यावेळी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील विविध भागात मागील काही दिवसापासून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आचारसंहितेमुळे प्रशासनाला तत्काळ मदत करण्यात अडचण येत आहे. दुष्काळसदृश स्थितीत उपायोजना आखून मदत करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारने केली आहे. राज्यातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील देखील मतदान झाले आहे. त्यामुळे आचारसंहितेत आयोगाकडून शिथिलता मिळेल, अशी सरकारला आशा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com