Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नाराजी नाट्य रंगले असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन 26 जानेवारी रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे काही सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले होते.
त्यावेळी अजित पवार यांनी ते राजीनामे स्वीकारण्याबाबत नकर दिला असल्याचे सांगितले होतं. मात्र काही दिवसांपूर्वी अचानकपणे हे राजीनामे स्वीकारण्यात आले असल्याचे समोर आल होत. त्यानंतर पुन्हा एकदा हे राजीनामे सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता आणखी एक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी आपला राजीनामा दिला आहे. महानगरपालिका कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असलेले गौतम खरात यांनी आपला राजीनामा दिला आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी मोटर मालक वाहतूक सेलचे सचिन जाधव , उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालवणी आणि आणि असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे त्यांनी राजीनामे दिले आहेत.
विशेष म्हणजे या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली असल्याचं सांगितले जात आहे. आता गौतम खरात यांनी दिलेला राजीनामे मध्ये म्हटले आहे की, मी निष्ठेने पक्षाचं काम केलं आहे. मात्र प्रदेश पातळीवरून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत नाही. आणि तसेच आमचा सन्मानही राखला जात नाही.
सध्या पक्षातील काही लोकांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा फक्त सन्मान होत असून त्यांनाच पद दिली जात आहेत. त्यामुळे मी पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं खरात यांनी स्पष्ट केला आहे.
विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात येणारे हे राजीनामे राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय बनला आहेत. यापूर्वी राजीनामा दिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी या सर्व गोष्टींमध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत हे नेते काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.