Pune News: महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची तरुणाईवरचं गारूड दिवसागणिक वाढतच चाललं आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसून येते. तिचं फॅनफाॅलोईंगही जबरदस्त वाढत चाललं आहे. आता याच नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) मोठ्या अडचणीत सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे थेट तिच्या अटकेची मागणी जोरदारपणे केली जात आहे.
पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर रोजी एक अपघाताची घटना घडली होती. कार आणि ऑटो रिक्षा यांच्यात हा अपघात घडला होता.या अपघातातील कार ही नृत्यांगना गौतमी पाटीलची होती. तिच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचं चांगलंच नुकसान झालं. याचवेळी रिक्षाचालकही जखमी झाला होता. या अपघातानंतर स्थानिका नागरिकांनी ताबडतोब रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पण या अपघातानंतर मोठी माहिती समोर आली आहे.
सिंहगड रोड पोलीस (Police) ठाण्यात शुक्रवारी(ता.3 ऑक्टोबर) या अपघातातील संबंधित रिक्षाचालकाचं कुटुंबीय दाखल झालं. गौतमी पाटीलच्या कारने धडक दिलेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावेत, अशी मागणीही कुटुंबियांनी पोलिसांकडे केली. तसेच यावेळी गौतमी पाटीलनं अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी,असंही रिक्षाचालकाच्या कुटुंबियानं म्हटलं आहे.
तसेच एवढा मोठा अपघात झाला असूनही गौतमीच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही किंवा साधा एक मेसेजही आला नाही असंही रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिस सहकार्य करत नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
पण आता पुणे पोलिसांनी आता अपघाताप्रकरणी कारवाईसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नव्हे तर,पोलिसांकडून या अपघात झालेल्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी झाडाझडती सुरू केली आहे. हे सीसीटीव्ही जर पोलिसांना मिळाले,तर गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार आहेत.
आता नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनं मोठी मागणी केली आहे. पोलिसांकडून या अपघातप्रकरणी गौतमी पाटीलला अटक करण्यात यावी, अशी मागणी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. यामुळे पोलिसांच्या तपास आणि कारवाईच्या दृष्टीनं वेगानं पावली उचलली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरातील या अपघातानंतर गौतमी पाटीलचा कारचालक घटनास्थळाहून फरार झाला होता.पण पोलिसांनी त्याला काहीवेळातच ताब्यात घेतले होते. पण आता या अपघातावेळी नृत्यांगना गौतमी पाटील संबंधित कारमध्ये बसलेली नसल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.
पण आता या अपघातातील रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी गौतमी पाटीलच्या टीमनं अपघाताची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे. त्याचमुळे अपघातात झालेलं गाडीचं नुकसान,गंभीर जखमी रिक्षाचालकावर सुरू असलेले उपचार याबाबत कुटुंबियांनी गौतमी पाटीलच्या टीमवर आरोप केले आहेत. तसेच तिच्यावर अटकेच्या कारवाईची मागणीही केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.