पुण्यातील कोथरुड भागातील वडगाव पुलाजवळ झालेल्या गौतमी पाटीलच्या कारच्या अपघाताची बरीच चर्चा झाली. या प्रकरणात गौतमी पाटील हीच्यावर अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांकडून आरोप झालेले असले तरी पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लीनचीट दिली आहे. ती कारमध्ये नव्हतीच असं पोलिसांनी म्हटलं आहे. पण तरीही या अपघाताच्या चौकशीसाठी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्याचं पोलिसांनी स्वतः सांगितलं आहे.
या अपघाताबाबत माहिती देताना डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितलं की, अपघातातील कार ही गौतमी पाटीलच्या नावावर आहे. गाडीचे काही पेपर्स आपल्याला इन्शुरन्ससाठी लागतात, त्यामुळं हे डिटेल्स मिळवण्यासाठी कदाचित कोथरुड पोलीस ठाण्यानं गौतमी पाटीलला पत्र पाठवलं असेल. चौकशीसाठी संबंधित व्यक्तीची गरज असेलच तर पोलीस अधिकारी तिला बोलावू शकतात. पण जर पोलिसाकडं आवश्यक कागदपत्रं जमा करण्यात आली तर चौकशीसाठी संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनला बोलावण्याची गरज पडत नाही. पण जर गरज भासलीच तर भविष्यातही तपास अधिकारी त्यांना बोलावू शकतात.
जमखी रिक्षावाल्याच्या मुलीनं पुणे पोलिसांवर या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. पोलीस गौतमी पाटीलवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत असं त्यांच म्हणणं आहे, या आरोपांना उत्तर देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणातात, पहिल्या दिवसापासून तपास पारदर्शीप्रमाणं होत आहे. ३० सब्टेंगर सकाळी ५ ते साडपेपाचच्या दरम्यान ही घटना वडगाव ब्रीजच्या सर्व्हिस रोडला झाली आहे. यामध्ये तपासात जो आरोपी निष्पण्ण झाला त्याचा लोकेशनवरील सीसीटीव्ही फुटेज किंवा सीडीआर लोकेशन असतील या सर्व गोष्टीवरुन जी फिर्याद दाखल केली आहे. म्हणजे रिक्षावाल्याचे जे सहकारी आहेत त्यांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन त्याच दिवशी त्याची फिर्याद आपण घेतली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन आपण यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीची मेडिकल टेस्ट देखील पोलिसांनी केली.
याप्रकरणात ड्रायव्हर ज्या ठिकाणाहून पुण्याकडं यायला निघाला तेव्हापासूनचे अपघातापर्यंतचे काही सीसीटीव्ही आपण तपासले आहेत तर काही सीसीटीव्ही तपासायचे बाकी आहेत. तसंच यामध्ये जे घटनास्थळावरील साक्षीदार आहेत त्यांचं देखील व्हिडिओ रेकॉर्डिंगमधील स्टेटमेंट आपण घेतलं आहे. यामध्ये फिर्यादींच्या नातेवाईकांना जर तपास काही शंका असेल तर ते कधीही पोलिसांकडं येऊ शकतात. त्यांना तपास कसा सुरु आहे याची माहिती दिली जाईल. यामध्ये लपवून ठेवण्याचं आणि चुकीच्या पद्धतीनं तपास करण्याचं काहीही कारण नाही.
ड्रायव्हरनं अपघात केलेला आहे. त्या तपासात प्राथमिकदृष्ट्या फक्त ड्रायव्हर गाडी चालवत होता. त्याच्या आगोदर त्याच्यासोबत असलेले त्याचे दोन मित्र हे पेट्रोल पंपावर उतरले, तसंच ड्रायव्हर भोरवरुन येत होता तेव्हा त्याच्यासोबत असलेला एक मित्र होता तो देखील आधीच उतरला होता. त्यामुळं जेव्हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळाचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यानुसार गौतमीचा ड्रायव्हर स्वतःच गाडी चालवत होता हे निष्पण्ण झालं आहे. यावेळी गौतमी पाटील प्रत्यक्ष गाडीत असल्याचं प्राथमिकदृष्ट दिसत नाही. पण जरी असली तरी हा अपघाताचा प्रकार आहे. यामध्ये ड्रायव्हरनं जर गुन्हा केला आहे तर कायद्यानुसार गाडीत बसलेल्या सह प्रवाशाचा किंवा मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना सहआरोपी करा अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही. अपघाताच्या गुन्ह्यात गंभीर अपघातप्रकरणी शिक्षाच ३ वर्षांपेक्षा खाली असते, त्यामुळं त्यामध्ये अटकेचा विषयच येत नाही.