Shivajirao Kale Sarkarnama
पुणे

Ghodganga Sugar Factory : घोडगंगा साखर कारखाना यंदा सुरू होणार का? शिवाजीराव काळेंच्या शंकांचे कारण काय?

Shivajirao Kale On Worker's Protest : "पावलोपावली तडजोड करूनही कारखाना व्यवस्थापन ढिम्म"

Sunil Balasaheb Dhumal

Shirur Political News : "रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी आपल्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन सुरू केले. लोकशाही मार्गाने सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. परिणामी यंदा कारखाना सुरू होईल की, नाही याची शंका आहे," असे म्हणत साखर कामगार नेते शिवाजीराव काळे यांनी कारखाना व्यवस्थापनावर सडकून टीका केली. या आंदोलनाचे पडसाद २९ सप्टेंबर रोजी कारखान्याच्या सभेवर उमटण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

काळेंनी साखर संकुलात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेला प्रस्ताव का अमान्य केला याचेही उत्तर दिले. 'कामगारांच्या पगारापोटी कारखान्याकडे २६ कोटी रुपये थकलेले होते. त्यावेळी कारखान्याने तीन महिन्यांचे पगार देण्याचे मान्य केले होते. यानंतरही पवारांनी फक्त एक महिन्याचा पगार देऊ आणि उरलेल्या रकमेच्या ठेवीचा प्रस्ताव दिला. आता कामगारांचा जगण्याचाच प्रश्न असेल तर ठेवी का ठेवायच्या,' असाही प्रश्नही काळेंनी उपस्थित केला.

काळे म्हणाले, 'इतर उद्योगांच्या तुलनेत साखर उद्योगातील कामगारांना अतिशय तुटपुंजे पगार आहेत. परिणामी दैनंदिन गरजा भागवताना नाकीनऊ येतात. आहे त्या पगारातच भागत नाही, तोही वर्षभर रखडवला जातो, यातील फक्त एक पगार घ्या आणि कामाला या, असा एकतर्फी प्रस्ताव मांडला जातो. जगण्याची धडपड करणाऱ्या कामगारांना त्यांच्याच पगाराची रकमेच्या ठेवी ठेवण्यास सांगितले जाते. यातून जगण्याचेच दोर कापून लोकशाहीत कामगारांची एकप्रकारे चेष्टाच केली जाते,' असा घाणाघातही शिवाजीराव काळेंनी केला.

'पगारवाढ, बढती मिळावी आणि इतर फायद्यांसाठी आमचे आंदोलन नाही. आम्ही केलेल्या कामाचे दाम द्या, याच मूळ मागणीसाठी तीन महिने आंदोलन सुरू आहे. कारखाना अडचणीत असल्याने २६ कोटी देऊ शकत नाही हे मान्य आहे. त्यामुळे या पगारातील फक्त ५० टक्केच रक्कम देण्याची मागणी केली आहे. यातूनही पीएफची रक्कम नंतर भरली तरी चालेल. यातूनही चर्चा करण्याची तयारी आहे. एवढी तडजोड करूनही व्यवस्थापन दहा टक्क्यांवर अडले असेल तर घोडगंगा कारखाना सुरू होण्याबाबत शंका निर्माण होते,' अशी टीका काळेंनी केली.

दरम्यान, कारखान्याची शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. या सभेत कामगारांच्या आंदोलनासह कारखाना कसा सुरू करायचा, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे या सभेत काय निर्णय होणार, याची उत्सुकता पुणे जिल्ह्याला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT