Amit Shah On BJP MLA : भाजप खासदार, आमदारांना धडकी; कामगिरीवरच मिळणार तिकीट, काय म्हणाले अमित शाह?

Maharashtra BJP Politics : लोकसभेतील कामगिरीवर आमदारांचे भवितव्य अवलंबून
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : देशात विरोधकांच्या इंडिया आघाडीला प्रतिसाद वाढला आहे. पोटनिवडणुकीचे निकाल भाजपविरोधात गेले आहेत. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. यातच केंद्रीय मंत्री अमित शाहांनी दिलेल्या दमामुळे राज्यातील भाजप खासदार, आमदारांना धडकी भरली आहे. यातूनच लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. देशात सत्तेची हॅटट्रिक करण्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

लोकसभेसाठी राज्यात भाजपचे मिशन ४५ ठरले आहे. या मिशनसाठीच केंद्रीय मंत्री शाह यांचे महाराष्ट्राचे दौरे वाढलेले आहेत. अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गणेशोत्सवानिमित्त मुंबईत येऊन गेले. गणेश दर्शनाला आलेल्या शाह, नड्डा यांनी भाजप खासदारांची शाळा घेतली. समाधानकारक काम नसेल तर लोकसभेचे तिकीट मिळणार नाही, असा सज्जड दम शाहांनी भरला आहे. त्यामुळे आमदार, खासदारांची झोप उडाली आहे.

Amit Shah
Shivsena MLA Disqualification : ठाकरे गटाचा नार्वेकरांना टोला; म्हणाले, 'कायद्याची मोडतोड कशी केली...'

समाधानकारक काम नसलेल्या खासदारांचा पत्ता कापला जाईल, असा दम शाह, नड्डा यांनी ताज्या भेटीत भरला आहे. यामुळे कामगिरी नसलेल्या खासदारांना धडकी भरली आहे. तसेच त्यांना कामगिरी सुधारण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे उमेदवारांसह पक्षाचीही प्रतिमा उजळून आगामी लोकसभेला फायदा करून घेण्याचे भाजपचे गणित आहे. (Maharashtra Political News )

शाह, नड्डांनी महाराष्ट्रातील आपल्या पक्षाच्या खासदारांसह आमदारांचेही कान टोचले आहेत. अगोदर लोकसभा निवडणूक असल्याने आणि विधानसभेला वर्ष बाकी असल्याने काहीसे निर्धास्त असलेल्या आमदारांनाही त्यांनी कामाला लावले आहेत. विधानसभेपूर्वी होणाऱ्या लोकसभेला जे आमदार प्रभावी ठरतील, आपल्या मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला मताधिक्य देतील, त्यांनाच पुन्हा तिकीट दिले जाईल, असे या जोडगोळीने सुनावले आहे. परिणामी खासदारांबरोबर आमदारही गॅसवर गेले आहेत.

मे २०२४ मध्ये लोकसभा, तर ऑक्टोबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. पण, ओसरत चाललेला आपला करिष्मा ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी धक्कातंत्रानुसार लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये घेऊ शकतात. त्यासाठी भाजपच्या खासदारांबरोबर आमदारांनाही आतापासूनच जोरात कामाला लागा, असे सांगण्यात आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Amit Shah
Ghodganga Sugar Factory : पोटासाठी तीन महिने आंदोलन; पण 'या' कामगारांकडे कुणाचेच नाही लक्ष !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com