Pune News: मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे प्रमोद सावंत यांनी 19 मार्च 2019 रोजी शपथ घेतली होती. गुरुवारी(ता.19 मार्च) सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला सात वर्षे पूर्ण झाली. पण आयुष्याला कलाटणी देणार्या याचदिवशी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना तातडीनं पुण्यात रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गुरुवारी गुढी पाडव्याच्या निमित्तानं आपल्या लेकीला भेटण्यासाठी पुणे दौर्यावर आले होते. पण दुपारी सावंत यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्यानं तातडीनं रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
प्रमोद सावंत यांचा धोका टळला असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोग्याला असलेला धोका तब्येत सध्या स्थिती करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
रुबी हॉल क्लिनिक'चे डॉ. परवेझ ग्रँट प्रमोद सावंत यांच्या तब्येतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना काल नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व तपासण्या पूर्ण झाल्या असून, त्यांचे सर्व अहवाल सामान्य (ठीक) आले आहेत; त्यामुळे दुपारी ते घरी परतणार आहेत. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. काल रात्री त्यांनी विश्रांती घेतली असून, आज ते घरी जाणार असल्याचंही शुक्रवारी (ता.20 मार्च) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आलेल्या पीटीआयच्या ट्विटमध्ये ग्रँट यांनी व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे.
डॉ. प्रमोद सावंत यांनी 19 मार्च 2019 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. गेल्या सात वर्षांपासून सावंत हे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीला 7 वर्षे पूर्ण झाली आहे.पण याचदिवशी त्यांच्यावर अँजिओप्लासटी या शस्त्रक्रियेची वेळ आली. यामुळे त्यांच्या गोवा भाजपसह त्यांच्या समर्थकांमध्ये काहीसं काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं.
पण आता त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा वेगानं सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली होती. यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांच्या डिस्चार्जविषयीची माहिती समोर आलेली नाही.
गोव्यात सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपनं आपला दबदबा निर्माण केला आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी फेब्रुवारी 2027 मध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आता पुन्हा एकदा या राज्यात भाजपनं सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या निवडणुकांसाठी भाजपसह काँग्रेस, आप, मगोप आणि क्रांतिकारी गोवन्स हे प्रमुख पक्ष राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. यातच आता या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीही एन्ट्री होणार असल्याचं आलं आहे.
महायुतीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वीच आमची शिवसेना आगामी गोवा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच त्यांनी ही निवडणूक शिवसेना फक्त लढवणारच नाही, तर गोव्याचा पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होईल असा दावाही केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.