Chinchwad By-Election : Sachin Bhosale
Chinchwad By-Election : Sachin Bhosale Sarkarnama
पुणे

Chinchwad By-Election : भाजपच्या सराईत गुंडांनी सिंमेटचे ब्लॉक फेकत जीवघेणा हल्ला केला : सचिन भोसलेंचा आरोप!

सरकारनामा ब्यूरो

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात जोरदारपणे सुरु असताना काल (दि.२२ रोजी) रोजी त्याला गालबोट लागलेले दिसून आले. ठाकरे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad News) शहरप्रमुख अॅड.सचिन भोसले (Sachin Bhosale) यांच्यावर सायंकाळी हल्ला झाला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सचिन भोसले माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "काल साडेपाच पावनेसहाच्या सुमारास माझ्या प्रभागातून प्रचार करत होतो. मी प्रचार करत असताना इतक्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जयदीप संपत माने, आकाश शेगडे, संदिप चव्हाण, यांच्यासोबत आणखी दोघे तीघे जण होते. या सर्वांनी माझा रस्ता अडवला.यावेळी माझ्यावर चार ही बाजूंनी हल्ला करण्यात आला. सिमेंटचे ब्लॉक फेकून मारण्यात आले. माझे कपडे फाडण्यात आले. पूर्वनियोजित हा हल्ल्याचा कट होता. मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता, असा आरोप त्यांनी केला आहे.

भोसले पुढे म्हणाले, "आमचा प्रचार अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला होता.याला अतिशयचांगला प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच हा हेतुपरस्पर हल्ल्याचा कट रचण्यात आला. मला संपवणयाचं त्यांचं षडयंत्र होतं. आता माझ्या आणि माझ्या परिवाराला धोका निर्माण झालेला आहे. हे भाजपचे कार्यकर्ते सराईत गुन्हेगार आहेत. जयदीप माने हे मोक्कातील आरोपी आहेत. त्यांच्यावरती यापूर्वी मोकाअंतर्गत कारवाई झाली होती. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, असे सचिन भोसले म्हणाले.

"माझ्यावरील या हल्ल्यानंतर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फोनवरून संपर्क साधला. तेव्हा फोन माझ्या पत्नीकडे होता. त्यांनी आमच्याशी संवाद साधला. ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत," असे ही सचिन भोसले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT