Eknath Shinde : 'MPSC आंदोलनाला काही जणांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न' : मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे?

MPSC New Exam Pattern 2025 : आयोगाच्या भूमिकेचं स्वागत करतो..
Eknath Shinde :
Eknath Shinde :Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यसेवा आयोगाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. नवीन अभ्यासक्रम आयोगाने यंदापासून नाही तर २०२५ (MPSC New Exam Pattern 2025) सालापासून लागू करण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती, अखेर आयोगाने विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य केली आहे, ट्वीट करून आयोगाने माहिती दिली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आयोगाच्या निर्णयाचं स्वागत आहे. एमपीएसीचे विद्यार्थी यांच्याशी मी फोनवर चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील चर्चा केली होती. शासन देखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होतं. आणि जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामध्ये आम्ही आयोगाशी देखील चर्चा केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतलाय. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो."

मुखमंत्री शिंदे पुढे म्हणाले, "यामध्ये आम्हालो कोणतंही राजकीय श्रेय घ्यायचं नव्हतं. तशी गरज नाही. पण काही लोक त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आडून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्नकरत होते. विरोधक या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारशी जोडत होते. तरीसुद्धा विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन, आम्ही सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता हा निर्णय घेतला, त्यांचं मी स्वागत करतो. "

दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे, याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली. आयोगाने घेतलेल्या निर्णयानंतर आता विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com