Pune News : पुण्यामधील प्रसिद्ध एफसी रोडवर 'लव्ह जिहाद'चा पॅटर्न सुरू असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते. 'काही मुलांनी मला सांगितलं की एफसी रोडला एक मुलींच्या कपड्याचे दुकानाच्या माध्यमातून लव्ह जिहाद सुरू आहे. इतर ठिकाणी जो ड्रेस चारशे रुपयाला मिळतो तो ड्रेस त्या दुकानांमध्ये दोनशे रुपयाला मिळतो. त्यामुळे स्वस्त असल्याने आपल्या सगळ्या मुली त्याच दुकानांमध्येच खरेदी करायला जातात. शंभर मुली झाल्या की त्यांना टार्गेट केलं जातं. त्यांचे नंबर मिळवले जातात, त्यांना संपर्क करून त्यातील चार-पाच मुलींना लव्ह जिहादला बळी पाडलं जातं', असा दावा पडळकर यांनी केला होता.
गोपीचंद पडळकर यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली होती. आता एफसी रोडवर व्यवसाय करणाऱ्या हिंदू व्यापारांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. असा कोणताही प्रकार एफसी रोडवर घडला असल्याचे अद्याप आमच्या निदर्शनास आलेलं नाही. तसं घडलं असतं तर सर्वप्रथम इथल्या हिंदू व्यापाऱ्यांनी हे सर्व प्रकार हाणून पाडले असता, असे म्हणत पडळकर यांच्या दाव्यातील हवाच येथील व्यापाऱ्यांनी काढून टाकली.
आतापर्यंत अशी कोणत्याही घटनेची तक्रार ही पोलिसांमध्ये देखील झालेली नाही. एफसी रोड मार्केटमध्ये अनेकदा रोहिंग्या, बांगलादेशी काम करत असल्याबाबत हिंदू संघटना दावा करतात मात्र आत्तापर्यंत तरी असा कोणताही कर्मचारी या ठिकाणी सापडलेला नाही. या सर्व आरोपांमुळे आमच्या व्यावसायावर परिणाम होत असल्याचे देखील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
एफसी रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम मारणे यांनी पडळकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मारणे म्हणाले, कोणतेही प्रकार घडल्याचे आमच्या निदर्शनास आलेलं नाही. आम्ही 'लव्ह जिहाद' सारख्या प्रकारास कोणतीही थारा देणार नाही. जर कोणते व्यक्ती मुलींना आमिष दाखवून फसवत असतील, तर तो प्रकार निंदनीय आहे. मात्र अशा कोणत्याही घटना आमच्या माहितीप्रमाणे घडलेल्या नाहीत.
जर खरोखरच असे काही घडले असते तर त्या घटना माध्यमांमध्ये ते गाजल्या असता आणि पोलिसांकडेही त्याची नोंद असती. परंतु पोलिसांकडे अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पडळकर जे म्हणतात तसा प्रकार घडत असेल तर त्यांनी तो थेट आमच्या निदर्शनास आणावा. आम्ही नक्कीच खबरदारी घेऊ, असे देखील मारणे यांनी सांगितले.
याआधीही एफसी रोड परिसरात बांगलादेशी किंवा रोहिंग्या नागरिकांच्या वावराबाबत आरोप झाले होते, मात्र पोलिस तपासात हे आरोप निराधार ठरले होते, असे मारणे यांनी यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याठिकाणी प्रामाणिकपणे व्यापार करत आहोत. मात्र रात्री 10-11 नंतर उशिरा एफसी रोड वरील व्यापाऱ्यांनी दुकान बंद केल्यानंतर इतर भागातून काही व्यापारी येतात ते कोण असतात याबद्दल आम्हाला माहिती नाही. मात्र ते 200 नव्हे तर 100 ला चार कपडे विकतात. त्यांच्याबाबत पोलिसांनी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचेही मारणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.