Gopichand Padalkar SarKarnama
पुणे

Padalkar Support to Bhandare : संग्राम भंडारेंसाठी पडळकर उतरले मैदानात; पुण्याच्या सीपींना विनंती करत म्हणाले ‘संपूर्ण हिंदू समाज...’

Sangram Bhandare Vs Vikas Lawande : विकास लवांडे शाईफेक प्रकरणात गोपीचंद पडळकर यांनी संग्राम भंडारे यांना पाठिंबा दिला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 09 May : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी म्हातोबाची येथे संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक करण्यात आली. त्याप्रकरणी भंडारेंसह त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही बाजूने त्यांचे समर्थक मैदानात उतरले आहेत. भंडारे यांच्यासाठी आता आमदार गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आहेत, त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांनाही विनंती केली आहे.

आमदार पडळकर म्हणाले, महाराष्ट्रात संत परंपरेला फार मोठं महत्व आहे. संतांनी नेहमी समाजाच्या कल्याणचं आणि हिंदू धर्माच्या रक्षणाचे कार्य केलेले आहे. महाराष्ट्रात आता या परंपरेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी काही भूमिका व्यक्त केली आहे. ही भूमिका अत्यंत निषेधार्ह होती.

विकास लवांडे यांनी जे गुरुवर्य आहेत, असे गोविंदगिरी, भास्कर गिरी, रामगिरी महाराज किंवा बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या वीस महाराजांनी घुसखोरी केली आहे, अशा पद्धतीचं चुकीचं विधान केलं हेातं, असा दावा पडळकर यांनी केला.

ते म्हणाले, लवांडे यांनी वीस महाराजांच्या संदर्भात जे विधान केले होते, त्यावरून संग्राम भंडारे यांनी आज काही प्रतिक्रिया दिली आहे. ती प्रतिक्रिया अत्यंत उत्स्फूर्त आहे. कारण गुरुस्थानी असणाऱ्या सर्व मंडळींच्या बाबत विकास लवांडे यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं होतं.

हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी संत परंपरा नेहमी अग्रेसर राहिलेली आहे. समाजातील चुकीच्या प्रवृत्ती बाजूला व्हाव्यात आणि चांगल्या रीती, रुढी, परंपरा रुजाव्यात. हिंदूराष्ट्र निर्माण व्हावं. हिंदूमध्ये ज्या पद्धतीने काही आक्रमणं होत आहेत. ती अतिक्रमणं आणि धर्मांतरं थांबवावीत, यासाठी संतांनी महत्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे, असेही पडळकर म्हणाले.

ते म्हणाले, संग्राम भंडारे यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, तिचं मी समर्थन करतो. तसेच, पुण्याच्या पोलिस आयुक्तांना माझी विनंती आहे की, मीडियात मी जे पाहतोय की, भंडारे यांनी रिव्हॉल्वर वापरलं. त्यांच्यावर आर्म ॲक्ट लागू करावा, अशी चुकीची स्टेटमेंट हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोक देत आहेत. पण प्रत्यक्षात शहनिशा करूनच पोलिसांनी पुढची पाऊलं उचलावीत. चुकीच्या पद्धतीने कोणताही गुन्हा संग्राम भंडारे यांच्यावर दाखल करण्यात येऊ नये. संग्राम भंडारेंच्या पाठीशी सर्व हिंदू समाज ताकदीने उभा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT