Solapur DCC : डीसीसीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नेत्यांचे स्वप्न पुन्हा भंगले; सरकारी निर्णयामुळे पदरी निराशा

Administrator Get Extension : सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. प्रशासकांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने इच्छुकांमध्ये निराशा पसरली आहे.
Solapur DCC
Solapur DCCSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 May : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांची पुन्हा निराशा झाली आहे. आर्थिक स्थिती सुधारल्याने सोलापूर डीसीसी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेतली जाईल, अशी आशा असताना प्रशासकांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आपल्याकडे सप्टेंबरपर्यंत पाऊस असतो, त्यामुळे पावसाळा झाल्यानंतरच सोलापूर डीसीसीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ शकते.

सोलापूर जिल्हा बँकेचे (Solapur DCC) तत्कालीन अध्यक्ष राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ मे 2018 मध्ये बरखास्त करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास आठ वर्षांपासून या बँकेवर प्रशासक कार्यरत आहेत. कुंदन भोळे हे सध्या बॅंकेचे प्रशासक म्हणून काम करत आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांना (Administrator) सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशासकांना मुदतवाढ देताना सहकार विभागाने सप्टेंबरपर्यंत अथवा संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत, यापैकी जे अगोदर होईल, तोपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे म्हटले आहे.

सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने संचालक मंडळाची निवडणूक घेतली जाईल, अशीच शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पुन्हा प्रशासकाला मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. प्रशासकांना मुदत संपल्यानंतर २०१८ पासून मुदतवाढ देण्यात आली आहे.

Solapur DCC
Vikas Lawande Ink Throwing Case : नीतेश राणे म्हणतात हे तर अपेक्षितच : विकास लवांडेंनी आपलं थोबाड बंद ठेवावं अन्‌ औकातीत राहावं...

सोलापूर डीसीसी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यापूर्वी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबवावा लागतो. मतदार यादीवर दावे व हरकती घेऊन मतदार यादी अंतिम केली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविला जातो.

अद्यापपर्यंत संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत आणि मतदार यादीबाबत काहीच सूचना आलेल्या नाहीत. पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत. ही सर्व परिस्थिती पाहता बँकेची निवडणूक तूर्तास तरी शक्य नाही.

Solapur DCC
Congress News : काँग्रेसचेही भाजपच्या पावलावर पाऊल; सोलापुरात दोन जिल्हाध्यक्ष अन्‌ एक शहराध्यक्ष नेमणार

बिगरशेती कर्जाची वसुली होईना

सोलापूर जिल्हा बँकेचा मिश्र व्यवसाय सध्या दहा हजार कोटींच्या पुढे गेला आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाल्याची एकीकडे परिस्थिती आहे. मात्र, दुसरीकडे बिगरशेती कर्जाची जुनी प्रकरणे तशीच आहेत. या थकबाकीदारांकडून कर्जवसुलीसाठी आणखी ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com