Niragudsar Gram Panchayat Results Sarkarnama
पुणे

Gram Panchayat Results : सहकारमंत्र्यांना मोठा धक्का; वळसे पाटलांच्या गावात शिंदे गटाचा सरपंच विजयी

Dilip Walse Patil News : शिंदे गटाचे रवींद्र जनार्दन वळसे यांनी तब्बल १३५ मतांनी सरपंचदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.

Vijaykumar Dudhale

Pune News : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या गावातच मोठा धक्का बसला आहे. वळसे पाटील यांचे गाव असलेल्या निरगुडसर ग्रामपंचायतीचे सरपंचपद शिंदे गटाकडे गेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून असलेली सत्ता वळसे पाटील गटाकडून प्रथमच गेली आहे. (Gram Panchayat Election Results : Defeat of NCP candidate in Sarpanch elections in Niragudsar of Dilip Walse Patil)

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर हे सहकारमंत्री वळसे पाटील यांचे गाव. तो पारंपरिक काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादीचा गड होता. मात्र, रविवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत दिलीप वळसे पाटील यांना गावात प्रथमच धक्का बसला आहे. त्यांचा बालेकिल्ला असलेल्या निरगुडसरमध्येच शिंदे गटाने ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. शिंदे गटाचे रवींद्र जनार्दन वळसे यांनी तब्बल १३५ मतांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटाचे सरपंचपदाचे उमेदवार रवींद्र वळसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळसे पाटील गटाच्या संतोष टाव्हरे यांचा पराभव केला आहे. तो पराभव तब्बल १३५ मतांनी झाल्याने त्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे सरपंचपद गमावले असले तरी ग्रामपंचायतींच्या सदस्यांमध्ये वळसे पाटील गटाने बाजी मारल्याचे दिसून येते.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या गटाचे पाच सदस्य निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांचे तीन सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे बहुमत वळसे पाटील गटाकडे असणार आहे. त्यांच्याकडे आठ सदस्य असणार आहेत. दुसरीकडे रवींद्र वळसे यांच्या पॅनेलचे तीन सदस्य निवडून आले आहेत, तर दोन अपक्षांनीही बाजी मारली आहे.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची अवस्था गड आला, पण सिंह गेल्यासारखी झाली आहे. थेट जनतेतून सरपंच निवडून देण्याच्या प्रक्रियेत त्यांना जोरदार धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या रवींद्र वळसे यांनी राष्ट्रवादीच्या संतोष टाव्हरे यांचा सहज पराभव केला आहे. त्यामुळे निरगुडसरच्या निकालाची राज्यात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT