Sainath Babar Prashant Jagtap Pramod Bhangire Sainath Babar Prashant Jagtap Pramod Bhangire
पुणे

Assembly Election : पुण्यातील 'या' मतदारसंघातून तीन पक्षाचे शहराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात! विधानसभेची तयारी जोरात

Sainath Babar Prashant Jagtap Pramod Bhangire : पुणे शहरांमध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघा मधील एकाच मतदारसंघामध्ये तीन प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष इच्छुक असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती कडून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसला तरी इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. काही इच्छुकांना पक्षाकडून काम सुरू करण्यासाठी सूचना मिळालेला आहेत तर काहींना उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल पक्षाकडून देण्यात आला आहे.

पुणे शहरांमध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघ मधील हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष इच्छुक असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून त्यांना उमेदवारी बाबत ग्रीन सिग्नल देखील मिळाल्याचे बोलले जात आहे.दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

शिवसेना शिंदे गटाला पुण्यातील किमान तीन जागा मिळाव्यात आणि त्यामध्ये हडपसरची जागा असावी असा आग्रह नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरलाची चर्चा आहे.

या दोन शहराध्यक्षां बरोबर आता मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील रेसमध्ये उतरले आहेत. साईनाथ बाबर यांनी आगामी विधानसभा निवडणूक आपण लढणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्या प्रकारची पोस्टर सध्या व्हायरल करण्यात येत आहेत.

दरम्यान पुणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवतीर्थया राज ठाकरे यांच्या निवास त्यांनी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान पुणे शहरातील आठही मतदारसंघाचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी आठ विधानसभा मतदारसंघाचा यावेळी आढावा देखील घेतला.

तसेच सर्व विधानसभा मतदारसंघात कामाला लागा अशा सूचना देखील राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना दिल्या आहे. राज ठाकरेंना भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर, किशोर शिंदे, बाबू वागस्कर हे मनसे नेते होते.

या भेटीदरम्यानच साईनाथ बाबर यांना हडपसर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून साईनाथ बाबर यांनी तशी तयारी सुरू केली आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT