Assembly Election : राष्ट्रवादीने वाढविले काँग्रेसचे टेन्शन; धुळ्यातील साक्री, शिरपूर मतदारसंघावर ठोकला दावा

Mahavikas Aghadi : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांबाबत बैठक झाली. साक्री येथे झालेल्या या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री आणि शिरपूर या दोन्ही मतदार संघावर दावा केला आहे.
Congress-NCP
Congress-NCPSarkarnama
Published on
Updated on

Dhule, 27 July : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे, त्यामुळे जागा वाटपाची चर्चा लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर या दोन्ही मतदारसंघांवर आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांबाबत बैठक झाली. साक्री येथे झालेल्या या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री (Sakri) आणि शिरपूर (Shirpur) या दोन्ही मतदार संघावर दावा केला. या दोन्ही मतदारसंघात पक्षाकडे प्रबळ उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि पदाधिकारी या दोन्ही मतदारसंघात सक्रिय आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक सदस्य निवडून गेले आहेत. त्यामुळे या संधीचा लाभ उठवला पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांचे मत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदार संघ महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात यावेत, असा आग्रह या पदाधिकाऱ्यांनी धरला. या वेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ललित वरुडे, महिला आघाडीच्या उषा पाटील, युवा आघाडीचे डॉ मनोज महाजन, अण्णा सूर्यवंशी, हेमराज राजपूत, व्यंकटेश पाटील, शिवाजीराव फुला पाटील, राजेंद्र भदाणे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Congress-NCP
Sunil Kedar : काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला मोठा झटका! आमदारकी गेली, आता निवडणुकही लढवता येणार नाही?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार ॲड गोवल पाडवी यांना या मतदारसंघातून ५२,६३० मतांची आघाडी आहे. ही आघाडी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. त्यामुळेच हे मताधिक्य शक्य झाले, असा या पदाधिकाऱ्यांच्या दावा आहे.

लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे पाडवी विजयी झाले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओढताण अटळ दिसते. निवडणुकीआधीच दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ आपल्याला मिळावेत, या दिशेने कामाला सुरुवात केली आहे.

Congress-NCP
Pandharpur Assembly : सुशीलकुमार शिंदेंच्या निकटवर्तीयाचे पंढरपूर विधानसभेसाठी नाव चर्चेत; भालकेंना महाआघाडी संधी देणार का?

सध्या हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहेत. ते काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ मानले जातात. यापूर्वी येथून अमरीश पटेल हे अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. या राजकीय पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेस महायुतीशी संघर्ष करण्याआधी दोन्ही काँग्रेस एकमेकांशीच लढण्याची शक्यता आहे. या विषयावर दोन्ही काँग्रेसमध्ये चांगलीच झुंपणार, हे मात्र स्पष्ट दिसू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com