Harshvardhan Patil
Harshvardhan Patil sarkarnama
पुणे

भाजप सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीने लढविणार; हर्षवर्धन पाटील उतरले मैदानात

डॉ. संदेश शहा,

इंदापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप (Bjp) संपूर्ण ताकदीने लढविणार असून या त्यासाठी सक्षम उमेदवार दिला जाईल. महविकास आघाडीच्या माध्यमातून रोज कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा गावो गावी केली जाते. त्याचे सोशल ऑडिट करावे, अशी मागणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली. येथील राधिका रेसीडेन्सी क्लबमध्ये तालुका भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Harshvardhan Patil News)

यावेळी भाजपच्या ६२ लोकांची कार्यकारिणी, ७ मोर्चे, २२ आघाडी असे एकूण १३०० लोकांना पदनियुक्ती पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषदेला नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विलास वाघमोडे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अशोक शिंदे, बाबा महाराज खारतोडे, माऊली चवरे, अरविंद जगताप, अंकुश पाडूळे उपस्थित होते. यावेळी ओबीसींना आरक्षण (OBC reservation) देण्यास अपयश आल्याबद्दल तसेच केंद्र सरकारच्या योजनेची उद्घाटन करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

पाटील पुढे म्हणाले, राज्यसरकार ओबीसी आरक्षण देवू शकले नाही. मात्र, भाजपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या उपस्थितीत मुंबई येथेझालेल्या बैठकीत २७ टक्के जागा ओबीसींना देण्याचा निर्णय करुन त्यांना न्याय दिला आहे. आगामी सर्व निवडणुकीत पक्षाची ध्येयधोरणे, झालेली कामे गाव तिथे भाजप शाखेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्यास प्राधान्य देणार आहोत.

जगात सर्वातजास्त सदस्य संख्या असलेला हा पक्ष असून पक्षाचे पंतप्रधान, अनेक राज्यात मुख्यमंत्री आहेत. सर्वाधिक खासदार व आमदार आहेत. हा पक्ष जातीयवादी आहे असे म्हणून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या पक्ष व नेत्यांची त्यांनी यावेळी खिल्ली उडविली. तालुक्यात नीरा भीमा कारखान्यात मुस्लिम महिला संचालिका असून १४१ मुस्लिम व इतर लोक विविध संस्थेत काम करत आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा लवकरच राज्यास भेट देणार असून सहकार चळवळ सक्षमीकरण करण्यास त्यामुळे चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT