मला माहित नाही हे अयोध्येत जाऊन काय करतात; जयंत पाटलांचा ठाकरेंना टोला

राज ठाकरे (Raj Thackeray) ५ जूनला आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) १० जूनला अयोध्येला जाणार आहेत.
Jayant Patil, Raj Thackeray, Aditya Thackeray
Jayant Patil, Raj Thackeray, Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर त्यापाठोपाठ लगेच १० जूनला शिवसेना (Shivsena) नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा केली. या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, मला माहित नाही हे आयोध्येत जाऊन काय करतात, असा टोला त्यांनी लगावला. रामाची भक्ती करत असतील तर रामजी बुद्धी देतील ती बुद्धी सर्व धर्म समावेशक असेल, असा माझा विश्वास आहे. फार महत्त्वाचे विषय नाहीत. महत्त्वाचे विषय महागाई आहे. सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत, असे पाटील म्हणाले.

Jayant Patil, Raj Thackeray, Aditya Thackeray
महाआरतीनंतर वसंत मोरे थेट राज ठाकरेंच्या भेटीला; कार्यक्रम ठरवूनच परतले...

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, प्रत्येक पक्षाला आप-आपला कार्यक्रम आणि प्रचार करण्याची मुभा आहे. कोरोना थोडासा कमी झाल्यामुळे लोक सुद्धा आता कार्यक्रमाला यायला लागली आहेत. त्यामुळे त्यांचे लोकशाहीमध्ये स्वागत आहे. त्यांची त्यांचे काम करावे, येवढेच आहे, समाजा-समाजामध्ये वाद घडवून आणू नका आणि दंगे घडवू नका, असा सल्ला भुजबळ यांनी दिला.

Jayant Patil, Raj Thackeray, Aditya Thackeray
बबली मोठी झाली नाही, ती अजूनही अल्लडच!

दरम्यान, शिवसेनेने अयोध्येमध्ये तयारीला सुरुवात केली असून काही स्थानिक शिवसैनिकांनी अयोध्येमध्ये बॅनर्स लावले आहेत. यात "असली आ रहा, नकली से सावधान" असा उल्लेख केलेला आहे. यावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स सध्या अयोध्येसह राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com