Ncp  Sarkarnama
पुणे

Bjp News : हर्षवर्धन पाटलांना धक्का; गंगावळणच्या सरपंच, उपसरपंचासह चार सदस्यांची राष्ट्रवादीत एंट्री

Sachin Waghmare

Political News : राज्यामध्ये ट्रिपल इंजिनचे सरकार असून भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र काम करीत आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी चुरस पाहवयास मिळते. इंदापूरचे आमदार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सातत्याने विकासनिधी, श्रेयावरुन चढाओढ सुरु असते. तालुक्यामध्ये पक्षफोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. एक वर्षापूर्वी इंदापूर तालुक्यातील गंगावळण ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली होती.

गंगावळण ( ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरंपचासह चार सदस्यांनी भाजपला रामराम ठाेकून राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (dattray bharne) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करुन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का दिला.

निवडणूकीमध्ये विजयी झालेले हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडे असणाऱ्या सरपंच निकिता प्रशांत गलांडे, उपसरपंच अभिजित विठ्ठल नलवडे, सदस्य रामहरी माणिक विपट, उज्वला रमेश जगताप, नंदा बाळासाहेब वाळुंजकर यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

भाजयुमोचा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदाची धुरा संभाळणारे प्रशांत गलांडे यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. गंगावळणच्या सरपंच, उपसरंपचाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला प्रवेश हा हर्षवर्धन पाटील (Harshvardhn patil )यांना धक्का मानला जात असून पाटील यांचे टेन्शन वाढणार आहे. विठाबाई विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष नितीन भारत पवार यांनी ही आमदार भरणे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले, गंगावळण हे उजनी तीरावरचे तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. गंगावळ पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी आणला दिला असून भविष्यात कोट्यवधी रुपयांचा निधी देवून गावाचा चेहरामोहरा बदलणार आहे. इंदापूरच्या तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नसल्याची ग्वाही भरणे यांनी दिली.

भरणेमामांच्या विकासकामामुळे प्रभावित

भाजपा युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजकाची धुरा असणारे व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे प्रशांत गलांडे यांनी सांगितले की, आमदार दत्तात्रय भरणे यांची विकासकामे गेल्या दहा वर्षांपासून पाहत असून मी प्रभावित झालो आहे. गावच्या विकासासाठी आमदार भरणे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून येणाऱ्या काळामध्ये ७० टक्केपेक्षा जास्त मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळवून देणार असल्याचे सांगितले.

Edited by: Sachin Waghmare

SCROLL FOR NEXT