Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटील यांची शिष्टाई आली फळाला

The Company Will Start From Thursday : दीड महिन्यापासून सुरू असलेला कामगारांचा संप मिटला.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

राजकुमार थोरात

Walchandnagar News : गेले दीड महिन्यापासून सुरू असलेल्या वालचंदनगर कंपनीचा संप मिटला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर या संपावर तोडगा काढण्यात यश आले आहे. ही कंपनी गुरुवारपासून (ता. 4) सुरू होणार आहे.

इंदापूर तालुक्यात असलेल्या वालचंदनगर कंपनीतील सुमारे 630 कामगार गेल्या 42 दिवसांपासून संपावर गेले होते. वेतनवाढीचा रखडलेला करार, थकीत देणी मिळावीत, यासाठी कामगारांनी हा संप पुकारला होता. संप सुरू झाल्याने त्याचा परिणाम वालचंदनगर परिसरावर झाला होता. हा संप मिटविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. हा संप मिटविण्यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेत आज (मंगळवारी) मंत्रालयात बैठक घेतली. कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Harshvardhan Patil
Nashik Politics : लोकसभा निकालावर विधान परिषद इच्छुकांची रणनीती; दराडेबंधूंना महायुतीचे कडवे आव्हान

या बैठकीला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी चिराग दोशी, व्हाईस प्रेसिडेंट धीरज केसकर, संजय गायकवाड, आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड, सचिव शहाजी दबडे, भारतीय मजूर संघाचे अध्यक्ष राहुल बावडेकर, शरद हनुमंते तसेच कामगार विभागातील सचिव, आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. कामगारांनी एक पाऊल मागे यावे, कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी चर्चा झाली. त्यानंतर दीड महिन्यापासून सुरू असलेला हा संप मागे घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कंपनीकडे कामगारांची 7 कोटी 84 लाख रुपयांची थकीत देणी होती. यातील 40 टक्के देणी सात दिवसांमध्ये व उर्वरित 30 टक्के रक्कम फेब्रुवारी महिन्यामध्ये, तर शिल्लक 30 टक्के रक्कम मार्चपर्यंत देण्याचे ठरले आहे. तसेच वेतनवाढीचा रखडलेला करारदेखील 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत करण्यात येणार असून कामगारांना वेतनवाढीच्या कराराचा 12 ते 15 महिन्यांचा फरक मिळणार आहे. या संपाच्या कालावधीमध्ये कंपनीने केलेली कारवाई कंपनी पाठीमागे घेणार असून उत्पादनवाढीसाठी कामगार व व्यवस्थापन एकत्र समन्वयाने काम करणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Edited by: Chaitanya Machale

Harshvardhan Patil
Raver Loksabha: एकनाथ खडसेंच्या स्वप्नांवर काँग्रेस फेरणार पाणी; पटोले रावेरबद्दल काय म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com