Harshwardhan Sapkal 2 Sarkarnama
पुणे

Congress Maharashtra : हर्षवर्धन सपकाळांनी 'या' चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी; काँग्रेस पक्ष संघटनेत मोठे बदल घडणार

Maharashtra Congress President Harshwardhan Sapkal Pune observers organizational changes party : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र संघटनेत बदल करण्यासाठी पुण्यातील चार नेत्यांना पक्ष संघटनेतील बदलाच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमध्ये आता बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत.

हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्याच दृष्टिकोनातून पुण्यातील चार नेत्यांवर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

आगामी काळात महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात उलथा पालथ पाहायला मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष काही कठोर निर्णय घेऊन वर्षानुवर्ष खुर्चीला चिटकून असलेल्या नेत्यांना लांब सारून नव्या फळीतील नेत्यांना संघटनेतील प्रमुख पदावर नेमणूक करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्याच दृष्टिकोनातून हर्षवर्धन सपकाळ यांनी तयारी सुरू केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रभर (Maharashtra) निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. या निरीक्षकांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निरीक्षकावर सोपविण्यात आलेल्या जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा जबाबदारी असणार आहे. त्यानुसार हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्याकरीता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षक शहर व ग्रामीण जिल्ह्यात जाऊन सर्व ब्लॉक अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा चर्चा करणार आहे तसेच, ब्लॉक निहाय बैठका घेऊन याबाबतचा अहवाल 15 दिवसांत प्रदेश कार्यालयाला सादर करणार आहे.

दरम्यान पुण्यातील चार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी चार जिल्ह्यांची निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार संजय बालगुडे यांच्यावर कोल्हापूर शहर आणि ग्रामीणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तसेच मोहन जोशी यांच्याकडे सोलापूरची, रमेश बागवे यांच्याकडे परभणीची आणि अभय छाजेड यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा अहवाल पाहून झाल्यानंतर राज्यभरात आधी मंडल, नंतर शहर, जिल्हा आणि राज्य असे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे या निरीक्षकांचे अहवाल अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT