MNS Pune : साहेबांनी सांगितलं, आता उद्यापासूनच खळ-खट्याक; पुण्यातील मनसे 'ऍक्टिव्ह मोड'मध्ये!

MNS Mumbai Raj Thackeray Marathi language Pune banks warning : मुंबई मनसे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्यावर भाष्य करताच पुण्यातील बँक आस्थापनांकडे पदाधिकाऱ्यांनी तपासणी सुरू करताच खळ-खट्याक आंदोलनाचा इशारा दिला.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Pune News : मनसेच्या झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी अनेक विषयांना हात घातला. औरंगजेब कबरीवरून सुरू असलेला वाद, कुंभमेळा, देशातील नद्यांची परिस्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि संभाजी महाराजांचे बलिदान या सर्व विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

त्यासोबतच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा छेडल्याचा पाहायला मिळालं. यानंतर पुण्यातील मनसैनिक पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडवर आले असून उद्यापासूनच खळ-खट्याक सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

पाडवा मेळाव्यातील भाषणामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत, आस्थापनामध्ये मराठी वापरली जाते का? ते बघा, असे आदेश मनसे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेला पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट करण्यासाठी राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे केला असल्याचं बोललं जात आहे.

Raj Thackeray
Bihar elections leadership: 'एनडीए'चा प्लॅन ठरला; बिहारच्या निवडणुका होणार 'यांच्या' नेतृत्वाखाली; अमित शाहांचे संकेत

दरम्यान राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनंतर आता पुण्यातील (PUNE) मनसे ॲक्टिव मोडमध्ये आली आहे. राज ठाकरे यांनी दिलेला सूचनेनुसार उद्यापासूनच मनसे मोहीम हातात घेणार असून बँक आणि ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठीचा वापर केले जात आहे का? नाही याची तपासणी करणार आहे. तसेच वेळ पडल्यास खळ-खट्याक देखील करण्यात येणार असल्याचं मनसेतून स्पष्ट करण्यात आला आहे.

Raj Thackeray
Raj Thackrey Politics: राज ठाकरेंच्या 'त्या' भूमिकेचे नाशिककरांनी केले स्वागत; कडू औषधाचा डोस भाजपला जमेल का? याचीच चर्चा

याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना पुणे मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, "राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बँका आणि अस्थापनाच्या तपासणीची मोहीम हातात घेण्यात आली आहे. आज बहुतांश आस्थापनांना सुट्टी असल्याने उद्यापासून ही मोहीम आमच्याकडून सुरू करण्यात येणार आहे".

'पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून शहरातील मोठ-मोठ्या आस्थापनांना भेट देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक पातळीवर पदाधिकारी आपापल्या भागातील ऑफिसेस आणि बँकांना भेटी देतील. तसेच मराठीचा वापर करण्याबाबत या आस्थापनांना पत्र देण्यात येतील आणि बँकांच्या बाहेर देखील मराठीमध्ये संवाद साधला जात नसल्यास तक्रार करण्यासाठी बोर्ड लावण्यात येतील', असे बाबर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com