Harshwardhan Sapkal: टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तुलनात्मक विधान केल्यानं हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सकाळपासून टीका होत आहे. अखेर संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सपकाळ यांनी सकाळी मालेगावमधील एका घटनेवर प्रतिक्रिया देताना टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली होती. त्यांच्या या विधानामुळं दिवसभर त्यांना टिकेचा सामना करावा लागतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील सपकाळांवर सडकून टीका केली होती. त्यांनी या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली होती.
मालेगाव महापालिकेतील उपमहापौर समाजवादी पक्षाच्या शाने-ए-हिंद यांनी आपल्या कार्यालयात केवळ टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यामुळं राज्यातील राजकारणच चांगलंच पेटलं. हा प्रकार समोर आल्यानंतर शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेत, हा फोटो काढण्याची आणि कारवाईची मागणी केली.
हा प्रकार चर्चेत असताना त्यावर हर्षवर्धन सपकाळांनीही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी टिपू सुलतानची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली. सपकाळ म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य ज्यापद्धतीचं आहे, त्यांचाच आदर्श घेऊन टिपू सुलताना यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिलेला आहे. या अर्थाने टिपू सुलताना शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले. त्यांनी कधीही विषारी विचारांना जवळ केलं नाही. शौर्याचं रक्षण म्हणून, टिपू सुलतान यांना शिवरायांच्या समकक्ष म्हटलं पाहिजे"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.