Autobiography Ban: निवृत्त अधिकाऱ्यांनी आता आत्मचरित्र लिहायचं विसरा! सरकार लवकरच आणणार नवा अध्यादेश

Autobiography Ban: लोकसभेत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या आत्मचरित्रावरुन झालेल्या राड्यानंतर केंद्र सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे.
Rahul Gandhi Manoj Narwane PM Modi .jpg
Rahul Gandhi Manoj Narwane PM Modi .jpgSarkarnama
Published on
Updated on

Autobiography Ban: लोकसभेत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या आत्मचरित्रावरुन झालेल्या राड्यानंतर केंद्र सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर २० वर्षे स्वतः आत्मचरित्र लिहिता येणार नाही, यासाठीचा अध्यादेश लवकरच येणार असल्याची माहिती मिळते आहे.

Rahul Gandhi Manoj Narwane PM Modi .jpg
Nirmala Navale: इन्स्टास्टार माजी सरपंच निर्मला नवलेंना हरवलं; भाजप उमेदवारानं उधळल्या नोटा? व्हिडिओ व्हायरल

सरकारी सुत्रांच्या हवाल्यानं माध्यमांतील वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये मंत्र्यांकडून उच्चपदांवर असलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून संवेदनशील माहिती प्रकाशित करण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. हा विषय सध्यातरी सरकारच्या अधिकृत अजेंड्यावर नसला तरी, लवकरच यासंदर्भात औपचारिक आदेश येण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा संदर्भानं भारत-चीन सीमावादावरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

Rahul Gandhi Manoj Narwane PM Modi .jpg
Mumbai : मेट्रो स्लॅब दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादीकडून महापौरांचं कौतुक अन् सवाल; तातडीनं खुलासा करण्याचं आवाहन

पण त्यांना सरकारच्या मंत्र्यांकडून बोलू दिलं गेलं नाही. लोकसभा अध्यक्षांनी देखील त्यांना हा औचित्यभंगाचा मुद्दा असल्याचं सांगत परवानगी नाकारली. पण यामुळं झालेल्या गोंधळात वारंवार सभागृहाचं काम स्थगित करावं लागलं होतं. पण राहुल गांधींच्या याक्षेपानंतर कथित पुस्तकाच्या हस्तलिखिताची पीडीएफ आवृत्ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. यामुळं या पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडियानं अनधिकृत व्हायरल पुस्तकाबद्दल कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता, यासंदर्भात लीक झालेल्या कागदपत्राबाबत दिल्ली पोलिसांनी एफआयआर देखील दाखल केला होता.

Rahul Gandhi Manoj Narwane PM Modi .jpg
Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांचा व्हॅलेंटाईन कोण? तुमचा बसणार नाही विश्वास; समाजवादी पक्षाच्या प्रमुखांनी स्वतःच सांगितलं

दरम्यान, जनरल नरवणे यांनी नंतर त्यांच्या प्रकाशकाच्या भूमिकेचे समर्थन केलं आणि हे देखील स्पष्ट केलं की, हे पुस्तक अद्याप अधिकृतरित्या सर्वसामान्य जनतेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. पण या पुस्तकाच्या हस्तलिखितातील मजकूर, विशेषतः भारत-चीन सीमेवरील कैलास पर्वतरांगात चीनकडून भारताच्या हद्दीत घुसण्याचा झालेला प्रयत्न अजूनही वादाच्या केंद्रस्थानी आहे. डिसेंबर २०२३मध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार होतं. त्याच्या प्री-ऑर्डरसाठी एक लिंकही शेअर करण्यात आली होती. पण पुस्तकातील वादग्रस्त मुद्द्याची कुणकुण लागताच संरक्षण मंत्रालयानं नरवणे यांना पुस्तक प्रकाशित न करण्याची विनंती केल्यानं लेखक नरवणे यांनी हे पुस्तक मागे घेतलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com